अकोली रस्त्याच्या भूसंपादनासाठी डीपीसीकडे निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:12 IST2021-01-22T04:12:50+5:302021-01-22T04:12:50+5:30

(महापालिका लोगो) अमरावती : अकोली वळण रस्त्याकरीता १.२६ हेक्टर जागेचे संपादन करायचे आहे. याकरिता प्रशासनाद्वारा १४ व्या वित्त ...

Demand for funds from DPC for land acquisition of Akoli Road | अकोली रस्त्याच्या भूसंपादनासाठी डीपीसीकडे निधीची मागणी

अकोली रस्त्याच्या भूसंपादनासाठी डीपीसीकडे निधीची मागणी

(महापालिका लोगो)

अमरावती : अकोली वळण रस्त्याकरीता १.२६ हेक्टर जागेचे संपादन करायचे आहे. याकरिता प्रशासनाद्वारा १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ४.२३ कोटींच्या वापरासाठी प्रशासकीय विषय बुधवारच्या आमसभेत ठेवण्यात आला. मात्र, पायाभूत सुविधांसाठी असलेला हा निधी अन्यत्र वापरण्यास सदस्यांनी नकार दिला आहे. त्याऐवजी विविध विकासकामांसाठी शासन व डीपीसीमधून निधीची मागणी करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला.

शहराच्या मंजूर विकास योजनेच्या सुधारित आराखड्यानुसार पश्चिम भागातून ६० मीटर रुंदीचाच सुमारे १६ किमी लांबीचा पर्यायी वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला आहे. यात १४ किमी रस्ता महापालिका हद्दीत व २ किमी बाहेर आहे. या रस्त्यामुळे भातकुली, अचलपूर, मोर्शी, अकोला व यवतमाळकडे जाण्याऱ्या सर्व वाहनांची वाहतुक वळती होणार आहे. यात चमननगर येथील १.२६ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी ४,२३,९३,४२८ रुपयांचा निधी १४ वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करावा, असा प्रशासनातर्फे विषय ठेवण्यात आला होता.

यावर ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यांनी यासोबतच इतरही विकासकामांसाठी शासनाकडे विशेष निधीची मागणी करावी व जिल्हा नियोजन मंडळाला प्रस्ताव दिल्यास पदाधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले. प्रकाश बनसोड, प्रशांत वानखडे, नाझिम, मिलिंद चिमोटे आदींनी सहभाग घेतला.

बॉक्स

एकत्रित प्रस्ताव पाठवा, महापौर

या वळण रस्त्यांच्या भुसंपादनासाठी राज्य शासनासह जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करावी व प्रशासनाने पाठपुरावा करावा. यासोबतच न्यायालयीन प्रकरणात प्रलंबित २० कोटींच्या देण्यासाठी एकत्रितपणे प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे निर्देश महापौर चेतन गावंडे यांनी दिले. त्यानुसार या प्रशासनाद्वारा लवकरच प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Demand for funds from DPC for land acquisition of Akoli Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.