पीककर्जासाठी नवीन शेतकऱ्यांना पाच मुद्रांकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST2021-06-17T04:09:47+5:302021-06-17T04:09:47+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे पैशाची जुळवाजुळव झालेली नाही, अशांनी बँकांचे उंबरठे झिजवणे सुरू ...

पीककर्जासाठी नवीन शेतकऱ्यांना पाच मुद्रांकाची मागणी
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे पैशाची जुळवाजुळव झालेली नाही, अशांनी बँकांचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. त्यातही राष्ट्रीयीकृत बँकांद्वारा कर्ज मंजुरीकरिता विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याचे बजावले जात आहे. त्यामुळे काही कागदपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने व काहींसाठी येरझारा मारावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे नाकीनऊ येत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
बॉक्स
पीककर्जासाठी ही कागदपत्रे हवी
शंभर रुपयांचे मुद्रांक प्रतिज्ञापत्राऐवजी स्वयंघोषणापत्र, शेतीचा सातबारा, आठ -अ, फेरफार, दोन पासपोर्ट साईजचे छायाचित्र, तलाठ्यांकडून नकाशा ही कागदपत्रे अनिवार्य आहे. मात्र, काही बँकांद्वारा नवीन कर्जधारकांना पाच मुद्रांक पेपर मागविले जात आहे. वास्तविक पाहता, एकाच मुद्रांकावर ॲफिडेव्हिट होत असताना शेतकऱ्यांना चारशे रुपये आगाऊ खर्च करण्यास भाग पाडत असल्याची प्रतिक्रिया शिराळा येथील अनिकेत खाडे या शेतकऱ्याने दिली.
बॉक्स
कोट
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पीककर्ज वाटपासंदर्भात शेतकऱ्यांकडून घ्यावयाचे आवश्यक कागदपत्राविषयी पत्र काढलेले आहेत. याची प्रत प्रत्येक बँक शाखांमध्ये पोहचलेली आहे. त्यानुसारच कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांनी करावयाची आहे. आगाऊ कागदपत्रांची मागणी केल्यास संबंधितांना माझ्या ९९२३८४४०४४ या क्रमांकावरून बोलणे करून द्यावे.
- जितेंद्र झा,
जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी (लीड) बँक, अमरावती