सखी सन्मान पुरस्काराचे थाटात वितरण

By Admin | Updated: October 27, 2016 00:09 IST2016-10-27T00:09:02+5:302016-10-27T00:09:02+5:30

विश्वाची जननी म्हणजे स्त्री. प्रत्येक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून शेकडो जबाबदाऱ्या पेलत असते.

Delivery of the Sakhi Samman awards | सखी सन्मान पुरस्काराचे थाटात वितरण

सखी सन्मान पुरस्काराचे थाटात वितरण

ज्येष्ठ साहित्यिक प्रभा गणोरकर यांना जीवन गौरव : पुष्पा सावलकर, रितू केडिया, मोहना कुळकर्णी, रजनी आमले, आशा शिरसाठ, प्रफुल्ला देशमुख, प्रतिमा इंगोलेंचा गौरव
अमरावती : विश्वाची जननी म्हणजे स्त्री. प्रत्येक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून शेकडो जबाबदाऱ्या पेलत असते. अशाच ‘सामान्य ते असामान्य’ प्रवास करणाऱ्या आठ स्त्रियांना ‘लोकमत’तर्फे ‘सखी सन्मान पुरस्कारा’ने गौरवून त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला. मुख्य प्रायोजक के.के.कॅम्ब्रीज इंटरनॅशनल स्कूल तर सहप्रायोजक हॉटेल महेफिल इन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा पार पडला.
येथील ‘हॉटेल महेफिल इन’च्या प्रशस्त लॉनवर मंगळवारी रात्री आयोजित चमकदार कार्यक्रमाला महापौर चरणजित कौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागचे माजी सचिव धनंजय धवड, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, के.के.एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष चंद्रभान केवलरामानी, हॉटेल महेफिल इनचे संचालक गोपाल मुंधडा, सुधा प्रभाकर वैद्य, जिल्हा कामगार अधिकारी डी.बी.जाधव, अभिनेता पवन शंकर, ‘लोकमत’चे संपादकीय प्रमुख गणेश देशमुख, उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे प्रमुख हे प्रमुख अथिती उपस्थित होते.
दर्जेदार साहित्यातून स्त्रियांची व्यथा, वास्तव स्थिती आणि कर्तृत्व समाजासमोर मांडणाऱ्या प्रतिथयश लेखिका प्रभा गणोरकर यांना सुधा प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्तरादाखल, अमरावती शहराने मला घडविले. व्हिएमव्ही महाविद्यालयात माझे शिक्षण झाले. तेथेच मी पीएचडी केली. १२ वर्षे शिकविलेही. माझ्या कार्याचा ‘लोकमत’ ने माझ्या कर्मभूमीत ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान केला. हा क्षण सदैव स्मरणात राहिल, अशा शब्दांत गणोरकर यांनी भावना व्यक्त केल्या.
परतवाडानजीकच्या हिरादल येथील आदिवासी सरपंच पुष्पा सावलकर यांना महापौर चरणजित कौर नंदा, जिल्हाधिकारी गित्ते यांच्या हस्ते त्यांनी केलेल्या भरीव सामाजिक कार्यासाठी गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक प्रतीमा इंगोले यांना रूपेश केवलरामानी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. रितु केडिया हिला बंगालचा उपमहासागर आणि इंग्लिश खाडी पोहून पार करण्याच्या धाडसी कामगीरीबद्दल धनंजय धवड आणि नितीन धांडे यांनी शौर्य पुरस्काराने सन्मानित केले. डॉक्टर मोहना कुलकर्णी यांना आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी चंद्रभान केवलरामानी यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. रजनी आमले यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी गोपाल मुंधडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी जिल्हा कामगार अधिकारी बी.डी.जाधव यांच्या हस्ते आशा शिरसाठ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यावसायिक क्षेत्रातील दमदार कार्यासाठी माहेर गृह उद्योगच्या प्रफुल्ला देशमुख यांना अभिनेता पवन शंकर यांनी पुरस्कृत केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरूवातीला स्थानिक शिव डान्स अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थिनींनी गणेशवंदना सादर केली. ऋतिका आगरे यांनी सादर केलेल्या लावणी नृत्याने उपस्थितांना खिळवून ठेवले. शिव डान्स अकादमीच्या चमुने ‘जय हो’ या गाण्यावर नृत्य सादर करून कार्यक्रमात देशभक्तीचा हुंकार जागविला.

Web Title: Delivery of the Sakhi Samman awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.