डिलिवरी बॉय, ड्राईव्हरने केली ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:13 IST2021-05-09T04:13:56+5:302021-05-09T04:13:56+5:30

पुसला : आधीच गॅस दरवाढीने नागरिक हैराण आहेत. यातच पुसला येथील नागरिकांनी डिलिवरीबॉय व ड्राईव्हरजवळ रिकामे सिलेंडर ...

Delivery boy, the driver cheated the customer | डिलिवरी बॉय, ड्राईव्हरने केली ग्राहकांची फसवणूक

डिलिवरी बॉय, ड्राईव्हरने केली ग्राहकांची फसवणूक

पुसला : आधीच गॅस दरवाढीने नागरिक हैराण आहेत. यातच पुसला येथील नागरिकांनी डिलिवरीबॉय व ड्राईव्हरजवळ रिकामे सिलेंडर व पैसे दिले. मात्र, महिनाभरापासून त्यांना सिलिंडर व नवीन जोडणी मिळाली नाही. याबाबत शेंदूरजनाघाट पोलिसांत तक्रार करण्यात आली. गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र, कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पुसला येथे एका गॅस एजन्सीने गॅसचे वितरण सुलभ व्हावे, यासाठी डिलिवरी बॉय म्हणून तेथीलच उमेश गेटमे याची नियुक्ती केली. दरम्यानच्या काळात वितरणात अनियमितता व पैसे घेण्याच्या तक्रारी होत्या. याकडे एजन्सीकडून दुर्लक्ष केल्या गेले. महिन्याभरापूर्वी येथील २४ नागरिकांनी ड्रायव्हरजवळ रिकामे सिलेंडर व पैसे दिले. काहींनी नवीन कनेक्शनसाठी रक्कम दिली. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ड्राईव्हर सुनील सुरजूसे पसार झाला आहे.

Web Title: Delivery boy, the driver cheated the customer