मेळघाटात ‘मेडिकल व्हॅन’मध्ये महिलेची प्रसूती
By Admin | Updated: June 1, 2016 00:41 IST2016-06-01T00:41:18+5:302016-06-01T00:41:18+5:30
मेळघाटातील ‘मेडिकल व्हॅन’मध्ये सोमवारी महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. तिने एका गोेंडस बाळाला जन्म दिला.

मेळघाटात ‘मेडिकल व्हॅन’मध्ये महिलेची प्रसूती
आदिवासींना सेवा : मातामृत्यू घटण्याची चिन्हे
अमरावती : मेळघाटातील ‘मेडिकल व्हॅन’मध्ये सोमवारी महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. तिने एका गोेंडस बाळाला जन्म दिला. प्रेमलता कैलास अजनेरीया असे नवप्रसूता मातेचे नाव आहे. फिरत्या मेडिकल व्हॅनमध्ये आदिवासी महिलांच्या प्रसूती योग्य पध्दतीने होत असल्याने मातामृत्यूंचे प्रमाण घटण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत.
नॅशनल मुंबई मेडिकल व्हॅनने मेमणा गावात तीन दिवसांपूर्वी दौरा केला होता. त्यावेळी डॉक्टरांनी प्रेमलता अजनेरीया यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत केले. प्रेमलता यांची प्रसूती सुखरुप व्हावी, याकरिता वैद्यकीय तज्ज्ञांनी तिच्या नातलगांचे समुपदेशन केले.
बाळासह माता सुखरुप
अमरावती : वैद्यकीय चमुने गावातील अंगणवाडीत रात्री मुक्काम ठोकला. प्रेमलताला प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी विवेक गोहाड यांच्या चमूतील एलएमओ सुषमा खोब्रागडे, एएनएम रंजना ढेवले यांनी प्रेमलता यांना व्हॅनमधील बेडवर घेतले.प्रेमलता यांनी व्हॅनमध्ये गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी प्रयोग शाळातंत्रज्ज्ञ राहुल गवई, फार्मासिस्ट हर्षल तायडे, वाहनचालक राजू शिरस्कार व विठ्ठल गायकवाड यांनी योगदान दिले. ही व्हॅन जि.पं.अतर्गत श्री शिवाजी शिक्षण संस्थेने कार्यान्वित केली आहे.