‘दिल्लीचाही सातबारा हवा तुला अन् मला रे, बळी राज्याच्या मुला रे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 22:27 IST2017-09-17T22:27:13+5:302017-09-17T22:27:26+5:30
‘दिल्लीचाही सातबारा हवा तुला अन् मला रे, बळी राज्याच्या मुला रे’... या आपल्या काव्याच्या माध्यमातून युथ फॉर स्वराज ही संघटना मागील वर्षभरापासून राष्टÑीय पातळीवर ही संघटना वर्षभरापासून...

‘दिल्लीचाही सातबारा हवा तुला अन् मला रे, बळी राज्याच्या मुला रे’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘दिल्लीचाही सातबारा हवा तुला अन् मला रे, बळी राज्याच्या मुला रे’... या आपल्या काव्याच्या माध्यमातून युथ फॉर स्वराज ही संघटना मागील वर्षभरापासून राष्टÑीय पातळीवर ही संघटना वर्षभरापासून विद्यार्थी युवक-युवतींमध्ये ‘बळी राजाच्या मुला’ संवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्टÑातील युवकांमध्ये शेतकºयांचे वास्तविक जीवन मांडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकºयाच्या मुलांनी राजकारणात पुढे येण्यासाठी, नवा राजकीय पर्याय देण्यासाठी, शेतकरी संघर्षासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत संवाद यात्रा कवी ज्ञानेश वाकुडकर हे महाविद्यालयात तसेच गावखेड्यात जाऊन संवाद साधत आहे.
ही यात्रा बापुकुटी (सेवाग्राम) येथून २८ आॅगस्टला सुरू झाली. यात्रेंतर्गंतच १२ सप्टेंबरला समाजकार्य महाविद्यालय बडनेरा येथे दिलीप काळे (प्राचार्य) यांचे अध्यक्षतेखाली तसेच तक्षशिला महाविद्यालय, श्यामनगर येथे मालु पडवाल (प्राचार्य) यांचे अध्यक्षतेखाली संवाद यात्रा संपन्न झाली. संवाद यात्रेला ज्ञानेश वाकुडकर यांनी शेतकरी बापाची व्यथा मांडून सरकारी उदासीनता, थापेबाजी यामुळे युवकांमध्ये सर्वत्र संताप आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने देऊ केलेल्या मदतीचे १० हजार कुणालाही मिळाले नाही. महादेव मिरगे (अध्यक्ष युथ फॉर स्वराज), धनंजय कुकडे (समन्वयक युथ फॉर स्वराज, अमरावती विभाग), विनायक निंभोरकर (अध्यक्ष जयकिसान आंदोलन), राजेंद्र राऊत (सचिव जयकिसान आंदोलन), दिवाकर देशमुख (समन्वयक), अशोक गायगोले, रमेश खोडे, साहेबराव खंडारे, राजू मनवर, दिगांबर तायडे, विनोद अडांगे, सिंधू भोरगडे यांनी संवाद यात्रेसोबत राहून सहकार्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी कल्पना भंडारी, नामदेव भगत, गोवर्धन म्हाला, युवराज खोडस्कर, गजभिये, तुपेकर, प्रितेश पाटील, शिवानी पचलोड, अक्षदा बारबुदे यांनी सहकार्य केले. संवाद यात्रेचा समारोप ४ नोव्हेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर युवकांची मानवी साखळी देवून योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात केला जाणार आहे.