लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:52+5:302021-04-08T04:13:52+5:30

अमरावती : शासनाने सोमवारी रात्री ८ वाजता जाहीर केलेले लॉकडाऊन हे व्यापारी, उद्योजक, कामगार, मजुरांसाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे शासनाने ...

Delete lockdown, merchants demand | लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांची मागणी

लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांची मागणी

अमरावती : शासनाने सोमवारी रात्री ८ वाजता जाहीर केलेले लॉकडाऊन हे व्यापारी, उद्योजक, कामगार, मजुरांसाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेत लॉकडाऊन हटवावा, अशी मागणी बिझिलॅंड, सिटीलॅंड येथील व्यापाऱ्यांनी केली. बुधवारी निदर्शने करून शासन धाेरणाचा निषेध नोंदविला.

दुकाने, प्रतिष्ठांनामध्ये कार्यरत कामगार, मजुरांना रोजगार कोण उपलब्ध करून देणार, असा सवाल किशनचंद कोटवानी यांनी उपस्थित केला. लॉकडाऊनचा निर्णय घेताना व्यापारी, उद्योजकांना विश्वासात घेण्यात आले नाही. याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. बिझिलॅंड, सिटीलॅंड व्यापारी संकुल ही ग्रामीण भागात माेडत असताना प्रशासनाला सतत सहकार्य केले. व्यवसाय नाही तर, जीएसटी कसा भरणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याबाबत पालकमंत्री यशाेमती ठाकूर यांना निवेदन सादर करण्यात आले. आता पालकमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा व्यापारी वर्गांना आहे.

००००००००००००

Web Title: Delete lockdown, merchants demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.