मागील वर्ष डोक्यातून डिलिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:14 IST2021-01-03T04:14:47+5:302021-01-03T04:14:47+5:30
फोटो पी ०२ यशोमती चांदूर रेल्वे : मागील वर्ष अत्यंत कठीण आणि वेदनादायक गेले. अनेक कोरोना योद्ध्यांनी स्वत:चा जीव ...

मागील वर्ष डोक्यातून डिलिट करा
फोटो पी ०२ यशोमती
चांदूर रेल्वे : मागील वर्ष अत्यंत कठीण आणि वेदनादायक गेले. अनेक कोरोना योद्ध्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून माणुसकीचे दर्शन घडविले. नव्या वर्षाचे स्वागत करताना मागील वर्ष मनातून आणि डोक्यातून डिलीट करा, असे मत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. त्या तालुक्यातील मांजरखेड येथील श्री पाताळेश्वर मंदिरात आयोजित रक्तदान शिबिर आणि कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रमात बोलत होत्या.
स्थानिक युवक काँग्रेस आणि जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वीरेंद्र जगताप होते. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी अध्यक्ष नितीन गोंडाने, नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी, माजी सभापती गणेश आरेकर, पंचायत समिती सदस्य अमोल होले, वर्षा देशमुख आदी उपस्थित होते. कोरोनाकाळात शेतकऱ्यांसोबत पोलीस, आशा वर्कर, डॉक्टर, सफाई कामगार अशा अनेकांनी सेवा दिली. त्यांचे आभार आणि सत्कार करणे गरजेचे असल्याचे मत जगताप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अशोक जयस्वाल, सुरेश मेश्राम, विजय क्षीरसागर, अशोक देशमुख, यांनी परिश्रम घेतले. संचालन सुरेखा मेश्राम, तर आभार सुमेद सरदार यांनी मानले.