शहरातील अतिक्रमण हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:09 IST2017-12-15T00:07:34+5:302017-12-15T00:09:38+5:30
शहरातील रस्त्यावर खासगी शिकवणी वर्ग व मंगल कार्यालयाचे अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष मयूर लांजेवार, यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नगरपालिका मुख्याधिकारी अढागळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शहरातील अतिक्रमण हटवा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील रस्त्यावर खासगी शिकवणी वर्ग व मंगल कार्यालयाचे अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष मयूर लांजेवार, यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नगरपालिका मुख्याधिकारी अढागळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, भंडारा शहराला तस पाहिले तर समस्याचे शहर म्हणायला हरकत नाही. शहरात दिवसेंगणिक नागरिकांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. ज्यांनी विश्वासाने मागील नगर पालिका निवडणुकीत भाजपा सरकारला निवडून दिले. नगराअध्यक्ष म्हणून थेट निवडून दिले. मात्र अध्यक्ष व नगरसेवक नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत.
भंडारा शहराला स्मार्ट सिटी बनवू असं स्वप्न लोकांना दाखविले होते. परंतू गोरगरीब फुटपाथ वर बसून व्यवसाय करणाºया लोकांचे अतिक्रमण हटवून त्यांना बेरोजगार करण्यात आले. खासगी प्रायवेट शिकवणी वर्गांतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सायकल आणि दुचाकी ठेवल्या असतात. त्या कारणांनी रस्त्यावर रहदारीसाठी जागा कमी असते. परिसरात राहणाऱ्या लोकांना, रस्त्यावर चालणाºया चार चाकी वाहनांना व रस्त्यावरच्या रहदारीला त्रास होत आहे. तसेच शहरातले लॉन व मंगल कार्यालये व प्राईवेट मल्टीस्पेश्यालीटी हॉस्पीटल, यांच्याकडे पार्कींगची सुविधा नसतानाही आलेले सर्व वाहन रस्त्यावर उभे राहतात.
मग या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई का करण्यात येत नाही. सर्वप्रथम याच लोकांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. फुटपाथ दुकानदारांना लवकरत लवकर एक विशिष्ट जागा देवून त्यांना रोजगार निर्मितीसाठी मदत करावी, अशी मागणी आहे. नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी येत्या १५ दिवसात या सर्व विषयावर लक्ष देवून करवाई करण्यात यावी, शिवसेनेतर्फे भंडारा शहरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात शिवसेना शहर प्रमुख मयूर लांजेवार, युवा सेना शहर प्रमुख निखील उपरीकर, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर टाले, मोईम शेख, मयूर मासुरकर, मंगेश मेश्राम, गोपाल वैद्य, रजत भुते, मयूर हलमारे, वासुदेव खेमेले यांचा समावेश होता.