विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीकडून पदवी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:00+5:30
संस्थेच्या विविध विद्याशाखांतील १६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत ४२ जण आहेत. ३२३ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्राप्त झाली असून, १४७० विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली आहे. ७९ जणांना अमेरिकेतील पदविका प्राप्त झाली आहे. १९ जणांनी आचार्य पदवी मिळविली आहे.

विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीकडून पदवी वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीकडून १८४३ पदवीकांक्षी विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रांगणात आयोजित दिमाखदास सोहळ्यात पदवी वितरण केले. संस्थेच्या विविध विद्याशाखांतील १६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत ४२ जण आहेत. ३२३ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्राप्त झाली असून, १४७० विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली आहे. ७९ जणांना अमेरिकेतील पदविका प्राप्त झाली आहे. १९ जणांनी आचार्य पदवी मिळविली आहे.
विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांना अमेरिकेतील डेलेवेअर विद्यापीठाचा बहुमान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. पदवी वितरण सोहळ्याला कमलताई गवई यांच्यासह उपाध्यक्ष उदय देशमुख, कोषाध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंह चौधरी, संस्थेचे कार्यकारी सदस्य शंकरराव काळे, नितीन हिवसे, रागिणी देशमुख, वैशाली धांडे, पूनम चौधरी यांच्यासह प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चचे प्राचार्य अमोल बोडखे, प्रो. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य एम.एस. अली, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. आर.एम. देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप काळे, कला व वाणिज्य महाविद्यालय (चांदूर रेल्वे) येथील प्राचार्य आर.एस. हावरे, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य लीना कांडलकर, दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. राजेश गोधळेकर, बॅरि. आर.डी.आय.के. अँड एन.के.डी. महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश देशमुख, प्रा. राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय (नांदगाव खंडेश्वर) येथील प्राचार्य ए.ए देशमुख, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चचे प्राचार्य सचिन दिघडे, औषध निर्माणशास्त्र शिक्षण व संशोधन संस्था (बोरगाव मेघे) येथील प्राचार्य आर.ओ. गंजीवाले, इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी (बोरगाव मेघे) येथील प्राचार्य बी.एस. साठे तसेच कार्यक्रम समन्वयक गजेंद्र बमनोटे उपस्थित होते.
याप्रसंगी नितीन धांडे, हेमंत देशमुख, युवराजसिंह चौधरी, नितीन हिवसे, उदय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस यांची भेट दिली. संचालन निकू खालसा व पूनम लोहिया यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.