फेसबुकवर फेक आयडी तयार करून तरुणीची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:50+5:302021-03-13T04:22:50+5:30
अमरावती : फेसबुकवर फेक आयडी तयार करून एका २५ वर्षीय तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी शहर सायबर पोलिसानी एका युवकाविरुद्ध गुन्हा ...

फेसबुकवर फेक आयडी तयार करून तरुणीची बदनामी
अमरावती : फेसबुकवर फेक आयडी तयार करून एका २५ वर्षीय तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी शहर सायबर पोलिसानी एका युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही घटना २० नोव्हेंबर २०२० ते आज पर्यंत घडली.
याप्रकरणी एका तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी अमित टेंभुर्णे याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४(अ)(ड), ५०६, सहकलम ६७ माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला.
महिलेच्या फेसबुकवर अमित टेंभुर्णे या नावाच्या व्यक्तीने फ्रेन्ड रिकवेस्ट पाठविली व ती मान्य करण्यासाठी त्याने तरुणीला वारंवार मॅसेज करून मोबाईल नंबर मागितला. या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीने आरोपीला मोबाईल क्रमांक दिला. मात्र आरोपीने घरातील लोकांना फोन करून तरुणीची बदनामी केली. तसेच फेसबुकवर फेक आयडी तयार करून गावातील लोकांना फेसबुकवर फ्रेंड रिकवेस्ट पाठवून तिची बदनामी केली. तसेच गावातील लोकांना व तरुणीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिमा दाताळकर करीत आहे.