शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

Deepali Chavan Suicide Case : श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 3:09 PM

Deepali Chavan Suicide Case: १ मे रोजी  पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा धारणी न्यायालयात हजर केले असता  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- नरेंद्र जावरे परतवाडा (अमरावती) : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या श्रीनिवास रेड्डी याला शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मुकुंद एस गाडे यांच्या न्यायालयाने सुनावली. दोन दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने दुपारी एक वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीचे आदेश होताच १:३०  वाजता धारणी पोलीस स्टेशनला आणून रीतसर बयान व नोंद घेण्यात आली. त्यानंतर पोलीस वाहनांमध्ये बंदोबस्तात जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. (Deepali Chavan Suicide Case: srinivasa reddy remanded in judicial custody for 14 days)

बुधवारी सायंकाळी नागपूर येथून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला वन विभागाच्या शासकीय निवासातून चौकशीसाठी अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने आणले होते आणि धारणी येथे आणून २९ एप्रिल गुरुवारी एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता अटक करून अहवालात मध्ये टाकण्यात आले.  दुपारी १ वाजता न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

१ मे रोजी  पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा धारणी न्यायालयात हजर केले असता  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान धारणी पोलिसांकडून कुठल्याच प्रकारची पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली नसल्याचे सरकारी अभियोक्ता भारत भगत यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

स्वतःच्या बॅगा घेऊन चढला रेड्डी पोलीस वाहनातव्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ पदावर कार्यरत एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी उच्चपदस्थ आयएफएस अधिकारी असल्याने पाच जिल्ह्यासह मंत्रालयापर्यंत त्यांचा चांगलाच तोरा होता अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा त्याच्या मागे पुढे चालत होता पोलीस कोठडीतून न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर पोलिसांनी परत त्याला धारणी पोलीस ठाण्यात आणले व त्याने त्याच्या एक पिशवी व एक काळया रंगाची बॅग स्वतःच उचलून पोलिसांच्या वाहनात त्याला बसावे लागले. 

पोलीस अधीक्षकांनी केली चौकशीजिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी पोलिस कोठडीत असलेल्या निलंबित आरोपी एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डीची शुक्रवारी सायंकाळी धारणी येथे जाऊन घटनेसंदर्भात चौकशी केली त्यादरम्यानच तपास अधिकारी तथा एसडीपीओ पुनम पाटील ठाणेदार विलास कुलकर्णी सपोनि प्रशांत गीते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते मात्र पोलिस अधीक्षकांनी बंद खोलीत तपास अधिकारी पुनम पाटील यांच्या उपस्थितीत चौकशी केली चौकशीत नेमके कुठले प्रश्न आरोपी श्रीनिवास रेड्डीला केले हे मात्र कळू शकले नाही.

टॅग्स :Deepak Chavanदीपक  चव्हाणAmravatiअमरावती