ह्यडाऊन ट्रेंडह्ण नव्हे चाचण्यांमध्येच घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST2020-10-14T05:00:00+5:302020-10-14T05:00:18+5:30

जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोनाग्रस्ताचा ग्राफ वाढायला सुरुवात झाली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढती व डबलिंगचा रेट २० दिवसांवर आलेला होता. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्येत अचानक घट होत असल्याने सर्व काही अनलॉक झाल्यावर अचानक कमी नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच रविवारी फक्त २३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग खंडित झाला का, अशी स्थिती निर्माण झाली होती.

The decline in tests is not a downward trend | ह्यडाऊन ट्रेंडह्ण नव्हे चाचण्यांमध्येच घट

ह्यडाऊन ट्रेंडह्ण नव्हे चाचण्यांमध्येच घट

ठळक मुद्देकमी रुग्णसंख्येमुळे संभ्रम : रविवारी ३१९ सोमवारी ७३६ नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संसर्गाच्या चार महिन्यांत रविवारी पहिल्यांदा सर्वात कमी २३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा ह्यडाऊनट्रेंडह्ण सुरु झाल्याची चर्चा होत आहे. प्रत्यक्षात ह्यत्याह्ण दिवशी फक्त ३१९ नमुने घेण्यात आल्याने रुग्णसंख्येत कमी आल्याची बाब आता स्पष्ट झालेली आहे. सोमवारी ७३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता, ९६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोनाग्रस्ताचा ग्राफ वाढायला सुरुवात झाली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढती व डबलिंगचा रेट २० दिवसांवर आलेला होता. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्येत अचानक घट होत असल्याने सर्व काही अनलॉक झाल्यावर अचानक कमी नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच रविवारी फक्त २३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग खंडित झाला का, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्या दिवशी रविवार असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नमुने घेणारी केंद्रे बंद होती. त्यामुळे स्वॅबचे कलेक्शन कमी झाले. पर्यायाने चाचण्यांची तपासणी कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी राहिल्याचे वास्तव आहे. आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी ही सप्टेंबर महिन्यात ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. रॅपिड अँटिजेनमध्ये हे प्रमाण उच्चांकी २० टक्क्यांपर्यंत आले होते. आता मात्र चाचण्या प्रोटोकॉलनुसार होत आहेत.

सप्टेंबर महिन्यात नमुन्यांची संख्या वाढली
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून बहुतांश तालुक्यांसह महापालिका क्षेत्रात रॅपिड अँटिजन चाचण्या वाढविण्यात आलेल्या होत्या तसेच विद्यापीठ लॅबमध्येही नवीन मशीन बसविण्यात आल्यानंतर चाचण्यांची तपासणी क्षमतावाढ करण्यात आलेली होती. सुरुवातीला नागपूरच्या एकाच लॅबमध्ये नमुने तपासणीला जायचे. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचीदेखील लॅब सुरू झाल्याने नमुने तपासणीची गती वाढती व पर्यायाने अधिक रुग्णांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The decline in tests is not a downward trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.