शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाच्या संशोधन कामगिरीत घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:50 IST

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी विद्यापीठाची आहे. परंतु, या महत्त्वाच्या बाबीकडे अमरावती विद्यापीठ माघारल्याचे वास्तव आहे.

बेव ऑफ सायन्सचा डेटा : पाच वर्षात केवळ २९८ संशोधन पेपर प्रसिद्ध, वरिष्ठांकडून संशोधनाकडे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची संशोधन कामगिरी(रिसर्च परफॉर्मन्स) कमालीची घसरली आहे. नॅक, यूजीसीच्या गाईड लाईनुसार नव संशोधनाला प्राधान्य देणे अनिवार्य आहे. तथापि, सन २०१६ ते जुलै २०२० या पाच वर्षात केवळ २९८ संशोधन पेपर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसा अहवाल 'बेव ऑफ सायन्सने डेटा' स्वरुपात जारी केला आहे. राज्यात अन्य विद्यापीठाच्या तुलनेत संशोधन कार्यात अमरावती विद्यापीठाची कामगिरी फार उत्तम नसल्याचे दिसून येते.

विद्यापीठ म्हटले की, उच्च शिक्षण, पीएचडी, एमफिल, पदव्युत्तर शिक्षणासह नव संशोधनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. समाजाभिमुख संशोधन करून ते देशाच्या विकासाचे आधारस्तंभ होतील, अशी अपेक्षा विद्यापीठाचा कारभार हाताळणारे उच्च विद्याविभूषित अधिकारी, पदव्युत्तर विभाग प्रमुखांकडून आहे. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी विद्यापीठाची आहे. परंतु, या महत्त्वाच्या बाबीकडे अमरावती विद्यापीठ माघारल्याचे वास्तव आहे. सन २०१६ ते २०१९ पर्यंत संशोधन शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित आहे. चांगल्या दर्जाचे संशोधन पेपर प्रसिद्ध करण्यासाठी विद्यापीठाकडून फारशे प्रयत्न होत नाही. विद्यापीठात महत्त्वाच्या जागी आसनस्थ अधिकाऱ्यांची संशोधन कामगिरी नगण्य आहे. नव संशोधकांना पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी ठोस प्रयत्न करण्यात आले नाही, अशा विविध बाबींमुळे विद्यापीठाचे रिसर्च परफॉर्मन्स घसरले, असे तज्ञ्जाचे मत आहे.अशी आहे पाच वर्षात संशोधन कामगिरीबेव ऑफ सायन्सच्या डेटानुसार सन २०१६ ते जुलै २०२० दरम्यान अमरावती विद्यापीठाने २९८ संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहे. यात २०१६ मध्ये १०१, २०१७- ७०, २०१८- ६३, २०१९- ४० तर जुलै २०२० मध्ये २४ संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहे. विद्यापीठाने सन २०१५ पूर्वी संशोधनात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.गत तीन वर्षांत विद्यापीठाला तीन पेटेंट नवीन मिळाले आहे. त्यापैकी एक पेटेंट कमर्शिअल करार झाला आहे. लोणार येथील संशोधनाची जबाबदारी मिळाली असून, राजीव गांधी सायन्स इंन्टिट्यूटसोबत संशोधनाचे काम करणार आहे. नव्याने संशोधनाचे काम वाढले आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र