जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:08 IST2018-09-17T22:07:03+5:302018-09-17T22:08:43+5:30
पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.
जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे ऐन शेंगा लागण्याच्या काळात सोयाबीन झाडांनी माना टाकल्या आहेत. कमी पावसात येणारे पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. परंतु, मृग नक्षत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा पावसाने ओढ दिली. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्या पावसावर तग धरून असलेले सोयाबीन आता पिवळे पडूृन सुकत चालले आहे. पिकांची स्थिती पाहून शेतकरी हवालदील होत आहेत. शेंगा भरल्या नसल्याने हे नगदी पीक शेतकºयांच्या हातून निसटले आहे. तिवसा तालुक्यातील २२ हजार १५३ हेक्टरवरील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात यावे व शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप यांनी केली. सोमवारी आठवड्याचा प्रारंभ असल्याने कुठल्याही बैठकीला झेडपी अधिकाºयांना बोलविण्यात येऊ नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आमदारद्वयांंनी केली. यावेळी झडेपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, रमेश काळे, हरिभाऊ मोहोड, नितीन दगडकर, नरेंद्र विघ्ने, वीरेंद्र जाधव, नौशाद पठाण, इम्रान खान, दिलीप काळबांडे, अभिजित मानकर, विष्णू राठोड, पिंटू गुडधे, ऐनुल्ला खान, पंकज देशमुख, नंदू खडसे, मुकद्दरखाँ पठाण, साहेबराव ठाकरे आदी उपस्थित होते.
मृग, उडिदाची खरेदी सुरू करा
मूग व उडीद बाजार समितीत दाखल होण्यास दोन आठवडे झाले. दोन्ही शेतमालाची मोठी आवक आहे. मात्र, व्यापारी मागतील त्या दरात शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २५०० रुपये नुकसान होत आहे. पणनमंत्री मात्र हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी आॅक्टोबरच्या मुहूर्तावर ठाम आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी आमदारद्वयांनी केली.
सोयाबीन पडले पिवळे
तिवसा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात सोयाबीनसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दमदार दिसणारे सोयाबीनचे पीक पिवळे पडून सुकत चालले आहे. त्यामुळे शेतकºयांचे हातचे नगदी पीक गेले आहे. दोन वर्षांच्या दुष्काळाने होरपळल्यानंतर मागील वर्षी शेतमालाला मिळालेला मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावी, अशी मागणी आमदारद्वयांंनी केली आहे.
खोलापूरच्या मतदार यादीतून नावे गहाळ
भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील जवळपास ७०० मतदारांची नावे यादीत नसल्याची तक्रार आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांच्यावतीने केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज संस्थेची मतदार यादी व विधानसभा, लोकसभा निवडणुकीची मतदार यादी यात फरक आहे. सदर मतदारांनी २०१४ च्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला. मात्र, तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदारांकडून याची तपासणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले.
जिल्हाभरात सोयाबीनचे पीक हातून गेले आहे. शेतकºयांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्वरित सर्वेक्षण करा. नुकसानभरपाई द्या. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा. मूग व उडीदाची खरेदी केंद्र सुरू करा.
- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा
विविध शेतांमध्ये सोयाबीन पिकाची अचानक पाहणी केली. पाहणीत नुकसान स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अहवाल शासनाकडे पाठवून, सर्र्वेेक्षणाबाबतचा निर्णय घेतला जाईल.
- अभिजित बांगर
जिल्हाधिकारी
सोयाबीनचे नुकसान प्रचंड आहे. मूग व उडिदाची शासकीय खरेदी केंद्र सुरू केली नाहीत. ते त्वरित सुरू करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
- वीरेंद्र जगताप
आमदार, धामणगाव रेल्वे