परीक्षा विकेंद्रीकरण ऐतिहासिक पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:35 IST2017-11-19T22:34:12+5:302017-11-19T22:35:07+5:30
हिवाळी-२०१७ च्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेण्याचा आणि परीक्षा विकेंद्रीकरणाचा विद्यापीठ प्राधिकारिणींचा निर्णय ऐतिहासिक असून नवी पद्धत संलग्नित महाविद्यालयांमध्ये योग्य पद्धतीने गुणवत्ता राखून राबविल्या जाईल, .....

परीक्षा विकेंद्रीकरण ऐतिहासिक पाऊल
आॅनलाईन लोकमत
अमरावती: हिवाळी-२०१७ च्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेण्याचा आणि परीक्षा विकेंद्रीकरणाचा विद्यापीठ प्राधिकारिणींचा निर्णय ऐतिहासिक असून नवी पद्धत संलग्नित महाविद्यालयांमध्ये योग्य पद्धतीने गुणवत्ता राखून राबविल्या जाईल, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी केले.
परीक्षा विकेंद्रीकरणाबाबत प्राचार्य आणि प्रतिनिधींच्या एकदिवसीय कार्यशाळेला प्र-कुलगुरू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जे.डी. वडते, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, उपकुलसचिव आर.व्ही. दशमुखे व वि.रा. मालवीय, सहायक कुलसचिव मोनाली वानखडे, अ.रा. काळबांडे, राहुल नरवाडे व मीनल मालधुरे उपस्थित होत्या.
परीक्षा संचालनासाठी ३० टक्के खर्च महाविद्यालयांना दिला जाईल. खर्चाची रक्कम वाढविण्याबाबत कार्यशाळेत मागणी झाली असता, परीक्षा संचालनासाठी जो खर्च होईल, तो विद्यापीठ नियमानुसार महाविद्यालयांना देण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. परीक्षा विकेंद्रीकरणाची पद्धत यशस्वी करण्यासाठी सर्वच महाविद्यालये सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्नरत असल्याबद्दल त्यांनी सर्व प्राचार्यांप्रती आभार व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिलीत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जे.डी. वडते यांनी प्रास्ताविक भाषणातून परीक्षा विकेंद्रीकरणावरील कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विशद केली आणि पी.पी.टी. प्रेझेन्टेशनद्वारा परीक्षा प्रणालीची माहिती उपस्थित सर्वांना दिली.