कचराकुंडीत आढळले मृत स्त्री अर्भक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:03 IST2018-04-29T22:03:08+5:302018-04-29T22:03:08+5:30
वालकट कम्पाऊंड येथील खत्री कॉम्प्लेक्ससमोरील कचरा कुंडीत मृत स्त्री अर्भक आढळून आल्याने रविवारी सायंकाळी खळबळ उडाली. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

कचराकुंडीत आढळले मृत स्त्री अर्भक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वालकट कम्पाऊंड येथील खत्री कॉम्प्लेक्ससमोरील कचरा कुंडीत मृत स्त्री अर्भक आढळून आल्याने रविवारी सायंकाळी खळबळ उडाली. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भादंविच्या कलम ३१८ अन्वये गुन्हा नोंदविला.
मोतीनगरातील रहिवासी प्रवीण रामकृष्ण देऊळकर हे कचरा कुंडीतील भंगार वेचत असताना, एका प्लास्टिक पिशवीत मृत अर्भक आढळून आले. त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार ठाणेदार शरदचंद्र कुळकर्णी यांच्यासह पीएसआय पंकज कांबळे, शिपाई प्रवीण म्हाला, गुल्हाने, वाहनचालक खरड यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांनी मृत अर्भकास इर्विन रुग्णालयात आणले. तपासणीनंतर त्याला शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले. ते अर्भक स्त्री असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.