सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ !
By Admin | Updated: May 3, 2015 00:31 IST2015-05-03T00:31:02+5:302015-05-03T00:31:02+5:30
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खासगी सावकारांकडील कर्जमाफीचा सरकार आदेश अखेर जारी करण्यात आला आहे.

सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ !
परवानाधारकांकडे धडकले आदेश : शेतकऱ्यांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
जितेंद्र दखणे अमरावती
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खासगी सावकारांकडील कर्जमाफीचा सरकार आदेश अखेर जारी करण्यात आला आहे. युती शासनाने पहिल्याच हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात आदेश काढण्यासाठी राज्य शासनाने ४ महिन्यांचा कालावधी लागला. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे ३० नोव्हेंबर २०१४ अखेर देय असलेले कर्ज आणि त्यावरील ३० जून २०१५ पर्यंतच्या सत्रात माफी मिळणार आहे. यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे.
सततच्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील प्रमुख कारण असल्याने विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे.
सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश प्राप्त झालेत. कर्ज माफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे सहनिबंधक यांच्याकडे अर्ज करावा.
- गौतम वालदे, जिल्हा निबंधक.