एमआयडीसीतील कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST2021-06-28T04:10:06+5:302021-06-28T04:10:06+5:30

पुष्पक कॉलनी येथे युवकाची आत्महत्या अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पक कॉलनी येथे मुकुंद बनराव जांगळे (२७) ...

Death of a worker in MIDC | एमआयडीसीतील कामगाराचा मृत्यू

एमआयडीसीतील कामगाराचा मृत्यू

पुष्पक कॉलनी येथे युवकाची आत्महत्या

अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पक कॉलनी येथे मुकुंद बनराव जांगळे (२७) या युवकाने २६ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ नाना जांगळे (२४) याच्या फिर्यादीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी मर्ग दाखल केला.

---------

मास्क न बांधल्याने दोघांवर कारवाई

भातकुली : शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिसांच्या गस्ती पथकाने चेहऱ्याला मास्क न लावणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई केली. देवीकिसन विनायकराव दंदे (३८, रा. हरतोटी) व करण सुरेश तांबे (१९, रा. वडगाव, ता. मूर्तिजापूर) अशी दोघांची नावे आहे. २६ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.

------------

मास्क न बांधल्याने कोतवाली पोलिसांकडून कारवाई

अमरावती : शहर कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाने चेहऱ्याला मास्क न लावणाऱ्या चौघांविरुद्ध कारवाई केली.

सतीश नारायणदास गुप्ता (४०, रा. मसानगंज), किशोर छबीलाल बिजारे (५४, रा. मसानगंज), नरेंद्र छगनलाल बनपुरिया (४८, रा. गोपालनगर) व सचिन संतोष गुप्ता (२४, रा. मसानगंज) अशी त्यांची नावे आहेत. ---------------

Web Title: Death of a worker in MIDC