मनुष्यदर्शनाने घाबरलेल्या मादी सायाळचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:36 IST2019-01-23T22:36:41+5:302019-01-23T22:36:54+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागात मुनष्यदर्शनाने घाबरलेल्या एका मादी सायाळचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली. घाबरल्याने सायाळचा मृत्यू झाल्याचे पशू वैद्यकीय विच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. सायाळ हा वन्यजीव विभागाच्या वर्गवारीत क्रमांक १ चा प्राणी आहे.

मनुष्यदर्शनाने घाबरलेल्या मादी सायाळचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागात मुनष्यदर्शनाने घाबरलेल्या एका मादी सायाळचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली. घाबरल्याने सायाळचा मृत्यू झाल्याचे पशू वैद्यकीय विच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. सायाळ हा वन्यजीव विभागाच्या वर्गवारीत क्रमांक १ चा प्राणी आहे.
एमबीए विभागप्रमुख संतोष सदार यांना बुधवारी सकाळी १०.३० वाजता परिसरातील लॉनवर सायाळ मृतावस्थेत असल्याची माहिती शिपायांनी दिली. त्यानंतर सदार यांनी ही बाब सुरक्षा विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र सयाम यांना कळविली. कालांतराने वनविभागाच्या चमुला पाचारण करण्यात आले. वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांच्या निर्देशानुसार घटनास्थळी वनपाल एस.डी. टिकले, किशोर डहाके, ओंकार भुरे आदी पोहचले. या चमुने मृत सायाळचा पंचनामा करून ते ताब्यात घेतले. सायाळच्या मृत्युचे नेमके कारण काय? याचा शोध घेणे वनविभागापुढे आव्हान होते. त्यामुळे वनविभागाने तज्ञ्ज पशूवैद्यकीय अधिकाºयांकडून विच्छेदन करवून घेतले. मृत सायाळ हे पाच वर्षांचे होते. पशू वैद्यकीय अधिकारी कुळकर्णी यांनी विच्छेदनानंतर वस्तुनिष्ठ अहवाल वन विभागाला दिला. विद्यापीठात बिबट, मोर, कोल्हा आता सायाळ देखील असल्याचे समोर आले आहे.
परिसरात वन्यजीवांचा संचार हा नवीन नाही. साप, मोर, कोल्ह्यांचा नियमित वावर आहे. मात्र, सायाळ मृतावस्थेत आढल्याने आम्हालाही धक्का बसला. त्याचा मृत्यू कशाने झाला, याचे कारण स्पष्ट व्हावे, यासाठी वनविभागाला पाचारण केले. हे सायाळ चार वर्षांचे असण्याचे अंदाज आहे.
- संतोष सदार,
विभागप्रमुख एमबीए
विद्यापीठात मृतावस्थेत आढळलेले मादी सायाळ हे पाच वर्षांचे होते. ती गर्भवती होती. तिच्या पोटात दोन पिले असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. घाबरल्यामुळे ते सायाळ दगावल्याचे पशू वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.
- कैलास भुंबर,
वनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी