डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: April 26, 2015 00:18 IST2015-04-26T00:18:45+5:302015-04-26T00:18:45+5:30

रसूतीदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातला.

The death of the woman due to lack of doctor's deficiency | डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

आरोप : अंबा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात गोंधळ
अमरावती : प्रसूतीदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातला. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत मुधोळकर पेठ येथील अंबा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात शुक्रवारी रात्री घडली. सोनाली विवेक देशमुख (३०, रा. गणोजा देवी, भातकुली) असे मृताचे नाव आहे.
सोनाली देशमुख यांना प्रसूतीकरिता अंबा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचे सिझेरीयन करताना अचानक मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी रोष व्यक्त करीत रुग्णालयात गोंधळ घातला होता. याबाबत रुग्णांचे नातेवाईक राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याकरिता गेले होते. मात्र, सिझेरीयनदरम्यान सोनालीचा रक्तदाब वाढल्याने प्रकृती बिघडली व ह्यदयाचे ठोके बंद पडले.यात सोनाली यांचा मृत्यू झाला असे, तेथील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी मुकेश पुरुषोत्तम नायसे यांच्या तक्रारीवरून पोलिसांना आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडगे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the woman due to lack of doctor's deficiency