निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:49+5:302021-03-04T04:22:49+5:30
घुईखेड : स्थानिक शिवाजी शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकरराव जानराव देशमुख ऊर्फ पी.जे. भाऊसाहेब निंभेकर (८४) यांचे वृद्धपकाळाने निधन ...

निधन वार्ता
घुईखेड : स्थानिक शिवाजी शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकरराव जानराव देशमुख ऊर्फ पी.जे. भाऊसाहेब निंभेकर (८४) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.----------------
किरणसिंह येवतीकर
अमरावती : ज्येष्ठ क्रीडा संघटक किरणसिंह येवतीकर (७४, रा. रुक्मिणीनगर) यांचे २८ फेब्रुवारीला निधन झाले. ते महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.
--
अमृतराव धवने
कुऱ्हा : जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अमृतराव बाजीराव धवने (८५) यांचे २४ फेब्रुवारीला निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.
-------
विठ्ठलराव घाटोळ
गुरुकुंज (मोझरी) : विठ्ठलराव नारायणराव घाटोळ (८०, रा. गुरुकुंज मोझरी) यांचे अल्पशा आजाराने अमरावती येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.