निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:16+5:302021-07-10T04:10:16+5:30
अण्णासाहेब खांडे अमरावती : प्रतिष्ठित नागरिक अण्णासाहेब उर्फ अण्णाजी उत्तमराव खांडे (८४, रा. कठोरा बू.) यांचे ...

निधन वार्ता
अण्णासाहेब खांडे अमरावती : प्रतिष्ठित नागरिक अण्णासाहेब उर्फ अण्णाजी उत्तमराव खांडे (८४, रा. कठोरा बू.) यांचे शुक्रवारी दुपारी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात सुजित व रणजीत अशी दोन मुले, पत्नी, सुना व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर कठोरा बु. येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------------------
फोटो पी ०९ रंजना वानखडे
रंजना वानखडे
चांदुर रेल्वे: मालखेड येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात कार्यरत मुख्याध्यापिका रंजना किशोर वानखडे (५६) यांचे शुक्रवारी सकाळी अमरावतीहून मालखेड येथे शाळेत येत असताना छत्री तलावनजीक अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई वडील असा आप्त परिवार आहे.
---------------------
पाणी पुरवठा योजनांसाठी बैठक
मोर्शी : मोर्शी वरुड तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन पाणी पुरवठा स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालायमध्ये बैठक संपन्न झाली.
---------------------