तळेगाव दशासरच्या संक्रमिताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:01 IST2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:01:18+5:30
धामणगाव शहरातील भालचंद नगर येथील एका ५५ वर्षीय इसमावर अकोला येथे उपचार सुरू होता. आज गुरुवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर इसमाचे दुकान सिनेमा चौकात असून त्या दुकाना समोरील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान तळेगाव दशासर येथील ५३ वर्षीय इसमाचा अमरावती येथे उपचार घेत असताना गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली.

तळेगाव दशासरच्या संक्रमिताचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील तळेगाव दशासर येथील एका कोरोना बाधिताचा गुरुवारी सकाळी अमरावती कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एक ५५ वर्षीय पुरुष संक्रमित निघाल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या १४ झाली आहे.
धामणगाव शहरातील भालचंद नगर येथील एका ५५ वर्षीय इसमावर अकोला येथे उपचार सुरू होता. आज गुरुवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर इसमाचे दुकान सिनेमा चौकात असून त्या दुकाना समोरील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान तळेगाव दशासर येथील ५३ वर्षीय इसमाचा अमरावती येथे उपचार घेत असताना गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली.
सदर इसमाच्या कुटुंबातील सहा व्यक्तींना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले. आतापर्यंत तालुक्यात एक महिला व दोन पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जळगाव आर्वी येथील तीन व शहरातील चार असे सात जण कोरोणामुक्त झाले. तर सहा जणांवर अमरावती येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांनी दिली.