नवजाताचा पलंगावरुन पडून मृत्यू

By Admin | Updated: November 13, 2014 22:54 IST2014-11-13T22:54:24+5:302014-11-13T22:54:24+5:30

प्रसूतीच्या असह्य वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला वेळेपर्यंत डॉक्टरांची मदत न मिळाल्याने अखेर ती बेडवरच प्रसूत झाली. पण, दुर्देवाने बेडवरून खाली पडल्याने डोळे उघडण्यापूर्वीच त्या नवजाताचा मृत्यू झाला.

Death of newborn bed | नवजाताचा पलंगावरुन पडून मृत्यू

नवजाताचा पलंगावरुन पडून मृत्यू

डफरिनमधील खळबळजनक घटना
इंदल चव्हाण - अमरावती
प्रसूतीच्या असह्य वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला वेळेपर्यंत डॉक्टरांची मदत न मिळाल्याने अखेर ती बेडवरच प्रसूत झाली. पण, दुर्देवाने बेडवरून खाली पडल्याने डोळे उघडण्यापूर्वीच त्या नवजाताचा मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूसाठी डफरीन रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाला महिलेच्या नातलगांनी जबाबदार ठरविले तर महिलेचे बाळ पोटातच दगावल्याचे येथील परिचारिकांचे म्हणणे आहे.
जिल्हा स्त्री रूग्णालयात शेकडो महिला प्रसूतीसाठी आणि इतर उपचारांसाठी दाखल होतात. दररोज या ना त्या कारणांनी हे रूग्णालय चर्चेत असते.
येथील अव्यवस्था, गैरप्रकार, डॉक्टर, परिचारिकांचा निष्काळजीपणा नेहमी चव्हाट्यावर येत असतो. परंतु प्रसूतीदरम्यान डॉक्टर उपस्थित नसल्याने बाळ बेडवरून पडून मरण पावल्याची ही घटना मात्र अंगावर शहारे आणणारीच आहे. बाळाला कुशीत घेण्यासाठी आसुसलेल्या त्या मातेचा आक्रोश पाहूनही रूग्णालय प्रशासनाला पाझर फुटला नाही. गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
राणी बन्सी राऊत (२०, रा.अचलपूर (कासमपुरा) असे त्या दुर्देवी मातेचे नाव आहे. राणी ही सात महिन्यांची गर्भवती होती. सातव्या महिन्यात त्रास होत असल्याने तिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ४ वाजता दाखल करण्यात आले. तेथेही उशिराच तपासणी झाली. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला डफरीनमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला.

Web Title: Death of newborn bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.