लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील हातीपुरा परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय इसमाचा गुरुवारी इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर रुग्ण इर्विनमध्ये हलविण्यापूर्वी ज्या खासगी रुग्णालयात दाखल होता, त्या रुग्णालय प्रशासनाने दाखल असलेल्या सर्व रुग्णांना सुटी देऊन अवघे रुग्णालयच सॅनिटाइज करवून घेतले.सदर रुग्णावर प्राथमिक इलाज करणारे डॉक्टर सोहेल बारी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, छातीत जडपणा आणि वेदना असल्याच्या तक्रारीसह हा रुग्ण १ एप्रिल रोजी सकाळी बेस्ट हॉस्पिटल येथे दाखल झाला. त्याचे इसीजी आणि एक्स-रे काढले गेले. त्याला बॅक्टेरियल न्यूमोनिया आणि एआरडीएस (अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम) असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. कोरानोतही खासकरून श्वसनसंस्थेसंबंधी लक्षणे जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी तातडीने त्या इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. कोरोना संशयित वाटल्यामुळे शासकीय रुग्णालयातून रुग्णाच्या घशातील लाळीचे नमुने विषाणूविज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. २ एप्रिल रोजी सायंकाळी रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेची शुक्रवारी शहरात चर्चा पसरली. शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. रुग्णाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. कोरानाची लागण आहे की कसे, यासाठी पाठविलेल्या नमुन्याचा अहवाल प्रलंबित आहे. त्याकडे आता लक्ष केंद्रित झाले आहे.असा आला मुद्दा समोरदफनविधी प्रक्रिया करण्यासाठी किती नातेवाईक जाऊ शकतात, अशी माहिती मृताच्या नातेवाइकांनी नागपुरीगेट पोलिसांना विचारली. त्यावर मृत्यू कशाने झाला, असा प्रश्न पोलिसांनी नातेवाइकांना केला. त्यावेळी कोरोना आजारासंदर्भात थ्रोट स्वॅब घेतल्याची माहिती पुढे आली. प्रशासन कामाला लागले.
अमरावतीत इसमाचा मृत्यू, रुग्णालयच केले सॅनिटाइज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST
सदर रुग्णावर प्राथमिक इलाज करणारे डॉक्टर सोहेल बारी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, छातीत जडपणा आणि वेदना असल्याच्या तक्रारीसह हा रुग्ण १ एप्रिल रोजी सकाळी बेस्ट हॉस्पिटल येथे दाखल झाला. त्याचे इसीजी आणि एक्स-रे काढले गेले. त्याला बॅक्टेरियल न्यूमोनिया आणि एआरडीएस (अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम) असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
अमरावतीत इसमाचा मृत्यू, रुग्णालयच केले सॅनिटाइज
ठळक मुद्दे‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल प्रलंबित : न्यूमोनियाचे प्राथमिक निदान