शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीत बुडून मुलीचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 19:28 IST

पूर्णा नदीपात्रात दोन दिवसांआधी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना मंगळवारी १५ वर्षीय कुमारिकेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संजना संतोष राठी (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 

अमरावती - पूर्णा नदीपात्रात दोन दिवसांआधी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना मंगळवारी १५ वर्षीय कुमारिकेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संजना संतोष राठी (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, चांदूरबाजार तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावरील पिंपळखुटा येथील पूर्णा नदीपात्रात मृत संजना आपल्या एका मित्र व मैत्रिणीसोबत पूर्णा नदीत खेळण्यासाठी गेली होती. नुकताच पूर्णा नदीला पूर आल्यामुळे पात्रात दुथडी वाहत आहे. पाण्यातून वाहून येणारे लाकडे पकडण्याचा प्रयत्न तिने केला असता तिचा तोल गेल्यामुळे ती घसरून प्रवाहात वाहू लागली. तिच्या सोबतच्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. संजना वाहून गेल्याची माहिती तिच्यासोबत असलेल्यांनी तिच्या पालकांना दिली. यानंतर तिचा शोध घेण्यात आला. तिचे प्रेत नजीकच्या टोंगलापूर येथील पूर्णा नदीच्या डोहात आढळून आले. स्थानिकांच्या सहाय्याने नदीतून प्रेत बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार वीरेंद्र अमृतकर करीत आहेत. या घटनेनंतर पिंपळखुटा परिसरात शोककळा पसरली आहे, मागील तीन दिवसांत पूर्णा नदीपात्रात चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे यंदा तालुक्यात कमी पाऊस झाला. मात्र पूर्णेच्या परिसरातील तालुक्यातील काही गावांत अतिवृष्टी झाल्यामुळे व मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे नदीला चांगलाच पूर गेला आहे.

टॅग्स :Accidentअपघात