पहिल्या दिवशी मरण दुसऱ्या दिवशी घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:27+5:302021-01-23T04:12:27+5:30
घरातील साहित्य जळाले, जीवितहानी नाही परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजर समितीसमोरील बालाजीनगरमधील प्रोफेसर कॉलनीतील शेरेकर यांच्या घराला अचानक लागलेल्या ...

पहिल्या दिवशी मरण दुसऱ्या दिवशी घराला आग
घरातील साहित्य जळाले, जीवितहानी नाही
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजर समितीसमोरील बालाजीनगरमधील प्रोफेसर कॉलनीतील शेरेकर यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत कागदपत्रे व फर्निचर खाक झाले. ज्या घराला ही आग लागली, त्याच घरातील कर्त्या पुरुषाचे आदल्या दिवशी निधन झाले.
घराच्या वरच्या माळ्यावर २२ जानेवारीला दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास ही आग लागली. यात त्या माळ्यावरील खोलीतील फर्निचर, कागदपत्रे जळाली. आग लागली तेव्हा घरात केवळ महिलांची उपस्थिती होती. नगर परिषदेची फायर ब्रिगेड उपलब्ध न झाल्यामुळे स्थानिक युवकांनी ही आग विझवली. प्रणय धंदर, गोलू कैथवास, ऋषी भगत, सुयोग महल्ले, आदित्य मोहोड, साहिल दाने, प्रतीक शिरभाते यांनी परिश्रम घेतले. त्यापूर्वी २१ जानेवारीला या घराचे मालक सेवानिवृत्त प्राध्यापक राम शेरेकर यांचे आजारामुळे निधन झाले. २१ जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर २२ जानेवारीला घरातील सर्व पुरुष मंडळी अस्थिविसर्जनाकरिता गेली होती. त्यावेळी आग लागली.
कांडलीतही आग
ही आग लागण्यापूर्वी शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतमधील सुधाकर शनवारे यांच्या राहत्या घरासह गाईच्या गोठ्याला आग लागली. यात घरासह गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.