एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू (सारांश)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST2021-01-04T04:11:41+5:302021-01-04T04:11:41+5:30
-------------------- पुन्हा ६० अहवाल पॉझिटिव्ह अमरावती : जिल्ह्यात रविवारी ६० अहवालांची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १९,९०१ झाली. ...

एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू (सारांश)
--------------------
पुन्हा ६० अहवाल पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात रविवारी ६० अहवालांची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १९,९०१ झाली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांची संख्यावाढ करण्यात आलेली आहे.
--------------------
उपचारातून बरे ६० जणांना डिस्चार्ज
अमरावती : उपचारातून बरे वाटल्याने रविवारी ६० रुग्णांना घरी सोडण्यात आले आााहे, जिल्ह्यात सद्यस्थितीत संक्रमणमुक्त रुग्णांची संख्या १९,१६० वर पोहोचली असल्याने दिलासा मिळाला आहे. हे प्रमाण ९६ टक्के आहे.
-----------------------
७ डिसेंबरपर्यत तापमानात वाढ
अमरावती : जिल्ह्यास विदर्भातील तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. ७ डिसेंबरपर्यंत ही स्थिती कायम राहील. नैऋत्य राजस्थानवर २.१ किमी उंचीवर चक्राकार वारे आणि आग्नेय दिशेकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांंच्या संयोगातून मध्यप्रदेशात ४ तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.