एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:12 IST2021-01-18T04:12:32+5:302021-01-18T04:12:32+5:30
---------------- रविवारी पुन्हा ७१ अहवाल पॉझिटिव्ह अमरावती : जिल्ह्यात पुन्हा ७१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २०,७७० झालेली ...

एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू
----------------
रविवारी पुन्हा ७१ अहवाल पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात पुन्हा ७१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २०,७७० झालेली आहे. उपचारादरम्यान बरे वाटल्याने रविवारी ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने कोरोना संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या आता १९,९९५ झालेली आहे, एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत हे प्रमाण ९६.२७ आहे.
-----------------
१७९ रुग्ण गृह विलगीकरणात
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत १७९ पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रात ६८, तर ग्रामीणमध्ये १११ रुग्णांना ही सुविधा देण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
-----------------
रुग्ण दुप्पटीचा रेट २६६ दिवसांवर
अमरावती : जिल्ह्यात अलीकडे कोरोना संसर्गात कमी आल्याने कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधीदेखील २६६.१० दिवसांवर पोहोचला आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण १५ दिवसांवर आले होते व त्यानंतर सातत्याने संसर्गात कमी आल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले.
--------------------
२१ जानेवारीनंतर पुन्हा शीतलहर
अमरावती : येत्या २२ जानेवारीदरम्यान जम्मू काश्मीरमध्ये पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे पुन्हा बर्फवृष्टीचे संकेत आहेत. त्यामुळे विदर्भात २१ जानेवारीनंतर थंडी वाढणार आहे. २२ ते २६ जानेवारी दरम्यान किमान तापमान १० अंशांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड म्हणाले. पुढील २ ते ३ दिवसांत पूर्व मध्य प्रदेशलगतच्या भागात हलक्या धुक्याची शक्यता आहे.
पूर्वेकडील वारे सक्रिय झाल्यामुळे विदर्भात बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त कोमट वारे प्रवेश करीत असल्यामुळे विदर्भात रविवारी किमान तापमान काही प्रमाणात वाढले आहे. कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर सकाळी किमान तापमान १३.२ अंश नोंदवले गेले. पुढील तीन दिवस कमाल तापमान ३२-३३ डिग्रीतर रात्रीचे तापमान १३-१५ अंशाच्या आसपास राहील. २० जानेवारीपासुन उत्तर भारतीय मैदानात पश्चिम-उत्तर दिशेकडून येणारे वारे सक्रिय होण्याची शक्यता असल्याने पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश मध्ये पुन्हा थंडीची सौम्य लाट येण्याची शक्यता असल्याचे बंड यांनी सांगितले.