निधन, निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST2021-02-09T04:14:27+5:302021-02-09T04:14:27+5:30
फोटो पी ०८ शेंदरे गजानन शेंदरे तळेगाव दशासर : भाजपच्या तळेगाव दशासर शहर अध्यक्षपदी गजानन बापूराव शेंदरे यांची निवड ...

निधन, निवड
फोटो पी ०८ शेंदरे
गजानन शेंदरे
तळेगाव दशासर : भाजपच्या तळेगाव दशासर शहर अध्यक्षपदी गजानन बापूराव शेंदरे यांची निवड करण्यात आली. तालुकाप्रमुख बाळासाहेब शिरपूरकर, पंचायत समिती सदस्य नरेंद्र रामावत यांनी त्यांच्या निवडीबाबत समाधान व्यक्त केले.
------------
फोटो पी ०८ लिलाबाई
निधन वार्ता
लीलाबाई गावंडे
येवदा : लीलाबाई श्रावण गावंडे (८०, रा. राजखेडा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, मुलगी असा आप्तपरिवार आहे. सुधाकर गावंडे यांच्या त्या मातोश्री होत.
--------
निधन
फोटो मोरे पी ०८
निळकंठ मोरे
अंजनगाव सुर्जी : प्रतिष्ठित नागरिक निळकंठराव अण्णाजी मोरे (९०, रा. टाकरखेडा मोरे) यांचे ४ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.
----------------
फोटो पी ०८ देवदास उमाळे
देवदास उमाळे
धामणगाव रेल्वे : निवृत्त शिक्षक देवदास उमाळे (८०, धामणगाव रेल्वे) यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी असा आप्तपरिवार आहे. चांदूर रेल्वे सार्वजनिक बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता प्रकाश उमाळे यांचे ते वडील होत.