'डीन' पदाचे रुजूनाट्य पोहोचले पोलिसात
By Admin | Updated: April 12, 2015 00:16 IST2015-04-12T00:16:24+5:302015-04-12T00:16:24+5:30
डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सुरु असलेल्या डीनपदाचे रुजूनाट्य अद्यापपर्यंत संपले नाही.

'डीन' पदाचे रुजूनाट्य पोहोचले पोलिसात
सोमवंशींची जाणेंविरुद्ध तक्रार : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात चर्चा
अमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सुरु असलेल्या डीनपदाचे रुजूनाट्य अद्यापपर्यंत संपले नाही. शनिवारी पुन्हा माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी कार्यभार सांभाळण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना पुन्हा पदभार न सांभाळता परतावे लागले. त्यामुळे सोमवंशींनी गाडगेनगर ठाणे गाठून जाणेंच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या रुजूनाट्यमुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात विविध चर्चेला उधाण आले आहे. पीडीएमसी येथील अधिष्ठाता रुजूनाट्य संपता संपेना असे दिसून येत आहे. शनिवारी पुन्हा माजी अधिष्ठाता सोमवंशी अधिष्ठाता पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना प्रवेशद्वारावरच ७ ते ८ सुरक्षा रक्षकांनी आत जाण्यास मनाई केली होती.
शिवाजी शिक्षण संस्थेचा वैयक्तिक वाद आहे. त्यांनी संस्था स्तरावर वाद निपटावा, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करता येणार नाही.
- के.एम. पुंडकर,
पोलीस निरीक्षक.
डीनच्या पद्भाराविषयी कायदेशीर योग्य भूमिका घेऊ, विद्यापीठ न्यायालय नाही. विद्यापीठ व संस्था दोन पक्ष आहेत. त्यामुळे सोमवंशींनी डीन कार्यालयात जाणे योग्य नाही.
- अरुण शेळके,
अध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था.