फार्मसी आॅफिसरचा बेमुदत संप
By Admin | Updated: June 23, 2014 23:38 IST2014-06-23T23:38:47+5:302014-06-23T23:38:47+5:30
आरोग्य सेवेत औषधी निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्याच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील फॉर्मसी आॅफिसर

फार्मसी आॅफिसरचा बेमुदत संप
अमरावती : आरोग्य सेवेत औषधी निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्याच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील फॉर्मसी आॅफिसर असोसिएशनने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारादेखील निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र फार्मसी आॅफिसर असोशिएशनच्या प्रमुख मागण्यांमध्ये आरोग्य सेवेत ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हास्तरावर रुग्णांकरिता औषध उपलब्ध करणे व रुग्णांना औषधाचे वाटप करणे ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करावी, औषध निर्माण अधिकारी यांना संपूर्ण सेवा काळात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांना पदोन्नतीची सेवा उपलब्ध करून द्यावी, फार्मसी अॅक्ट १९४८ कलम ४२ चे होत असलेले उल्लंघन टाळण्यासाठी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातील कमी करण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी पदाची पुनर्निर्मिती पूर्ववत दोन पदे कायम करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी फार्मसी आॅफिसर असोशिएशनने हे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात अध्यक्ष प्रकाश कोकर्डेकर, शरद बेथेरिया, रामदास कावरे, कार्याध्यक्ष अनिल राऊत, अब्दुल रहमान, अमोल वारकरी, जे. ए. वसतकर, मंदा वऱ्हे, एस. पी. थोरात, स्नेहल शिरभाते, आर. एस. ढबाले, शुभांगी सारवे, शैला रंगारी व अन्य फार्मासीचा समावेश होता. (प्रतिनिधी)