मृतावस्थेतील खवले मांजर रात्री झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST2021-03-31T04:13:08+5:302021-03-31T04:13:08+5:30

वनविभागाच्या वसाहतीपुढील घटना : मोकाट श्वानांनी तोडले लचके चिखलदरा : वनविभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वसाहतीपुढे सोमवारी पहाटे खवले मांजर मृतावस्थेत आढळून ...

The dead scaly cat went missing at night | मृतावस्थेतील खवले मांजर रात्री झाले बेपत्ता

मृतावस्थेतील खवले मांजर रात्री झाले बेपत्ता

वनविभागाच्या वसाहतीपुढील घटना : मोकाट श्वानांनी तोडले लचके

चिखलदरा : वनविभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वसाहतीपुढे सोमवारी पहाटे खवले मांजर मृतावस्थेत आढळून आले होते. सायंकाळी मात्र ते बेपत्ता झाले. कुत्र्यांनी लचके तोडून ते फस्त केल्याची माहिती आहे. थेट वनाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानापुढे हा प्रकार घडल्याने पर्यटनस्थळावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर सुरुवात करताच वनविभागाच्या कर्मचारीसह वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान आहे. वनविभागाच्या या वसाहतीपुढे सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नागरिकांना खवले मांजर मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. दिवसभर ते तेथेच पडून होते. परंतु, सायंकाळनंतर बेपत्ता झाल्याने दिवसा काही मोकाट कुत्र्यांनी लचके तोडून फस्त केल्याची चर्चा होती. यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला चिखलदरा येथील शासकीय निवासस्थान व कार्यालयात आणल्याने परिसरातील त्याच्याजवळील काही अधिकारी व वनकर्मचारीसुद्धा चांगले दहशतीखाली दिसून आले.

---------------

Web Title: The dead scaly cat went missing at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.