मृत कोंबड्या फेकल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:19+5:302021-03-18T04:13:19+5:30
रिद्धपूर येथील प्रकार, रिद्धपूर : स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गावातील दगावणाऱ्या कोंबड्या फेकल्या जात आहे. त्यामुळे अज्ञात आजार ...

मृत कोंबड्या फेकल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात
रिद्धपूर येथील प्रकार,
रिद्धपूर : स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गावातील दगावणाऱ्या कोंबड्या फेकल्या जात आहे. त्यामुळे अज्ञात आजार पसरण्याची भीतीदेखील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथील नागरिक पूरक उत्पन्नाकरिता कोंबडीपालनाचा व्यवसाय करतात. कोंबड्यांवर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने घरगुती पक्षीही मोठ्या प्रमाणात दगावत आहेत. अशा दगावलेल्या कोंबड्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात खड्डा न करता जमिनीवरच फेकल्या जात आहेत. यामुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय अज्ञात आजाराचा संसर्ग पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
स्थानिक रहिवासी हरिदास नानोटकर यांनी रिद्धपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकाला याबाबत माहिती दिली. आरोग्य सेवकाने घटनास्थळाची पाहणी करून ग्रामपंचायतीला नागरिकांना असे करण्यापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.
-----------
आरोग्य सेवकांनी ग्रामपंचायतीला पत्र दिल्यानंतर मृत कोंबड्यांचे स्वॅब घेणे आवश्यक होतचे. त्याद्वारे त्यांच्या मृत्यूचे कारण पुढे आले असते. याबाबत आरोग्य विभागाने औदासीन्य दाखविले आहे.
- मनोज वानखडे, सामाजिक कार्यकर्ता