मृत काळवीट बेपत्ता
By Admin | Updated: July 19, 2015 00:26 IST2015-07-19T00:26:55+5:302015-07-19T00:26:55+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणगावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता काळवीट जखमी झाले होते.

मृत काळवीट बेपत्ता
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणगावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता काळवीट जखमी झाले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतरही वनविभाग कर्मचारी घटनास्थळी तब्बल तीन तास उशिरा पोहचल्याने काळवीट घटनास्थळावर आढळून आले नाही. कोणीतही अज्ञाताने काळवीट गायब केले असावे, अशी शंका उपस्थित झाली आहेत. वनकर्मचारी वेळेवर घटनास्थळी पोहोचले असते तर, काळविटला वाचवू शकले असते, असे मत वन्यप्रेमींचे आहे.
शिवणगावजवळ एक काळवीट मार्गाच्या कडेला जखमी अवस्थेत असल्याची माहिती काही वन्यप्रेमीने वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांना दिली होती. त्यांनतर तासभर वन्यपे्रमीनी घटनास्थळी वनकर्मचाऱ्यांची प्रतीक्षा केली. तासभरानंतर पुन्हा वन्यप्रेमींनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पुन्हा तासभर वनकर्मचाऱ्यांची प्रतीक्षा केली. मात्र, वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाही. सायंकाळचा अंधार पडल्यावर शिकारी प्रतिबधंक पथकाचे पी.टी. वानखडे, अमोल गावनेर, उज्जैनकर, सतीश उमक, मनोज ठाकूर, चंदू ढवळे वाहन चालक राजू काकड यांनी घटनास्थळी रवाना झाले. पथकाने नांदगाव खंडेश्वर मार्गावर जखमी काळविटचा शोध तब्बल चार तास गमावले, मात्र, कुठेही जखमी काळवीट आढळून आले नाही. त्यामुळे मृत काळवीट कोणीतरी उचलून नेल्याचा संशय वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिकारीच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून गेल्या काही वर्षांत मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनाही वनविभागाने ताब्यात घेतले होते. त्यामुळे मृत काळवीटचे मांसही छुप्या मार्गाने विक्री करण्याकरिता नेले असू शकते, असा संशय वन्यप्रेमींनी वर्तविला आहे. जखमी काळविटबद्दल वनविभागाने तत्काळ दखल घेतली असती तर, काळवीट वाचले असते. (प्रतिनिधी)
जखमी अवस्थेत काळवीट असल्याची माहिती सायंकाळनंतर मिळाली होती. काळविटचे लोकेशन माहिती नसल्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर मार्गावर पाहणी केली. मात्र, काही आढळून आले नाही.
-पी.के.लाकडे,
वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी.