दत्तापूर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी
By Admin | Updated: August 10, 2015 00:06 IST2015-08-10T00:06:18+5:302015-08-10T00:06:18+5:30
बाजार समितीसह विविध सहकारी संस्थेत भ्रष्टाचार करून आपला स्वार्थ साधणाऱ्यांना या संस्थेपासून दूर ठेवावे व शेतकरी हित जोपासणाऱ्यांना संधी द्यावी,

दत्तापूर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी
अरूण अडसड यांचे मत : शेतकी खरेदी-विक्री संघ निवडणूक
धामणगाव रेल्वे : बाजार समितीसह विविध सहकारी संस्थेत भ्रष्टाचार करून आपला स्वार्थ साधणाऱ्यांना या संस्थेपासून दूर ठेवावे व शेतकरी हित जोपासणाऱ्यांना संधी द्यावी, असे मत भाजप नेते अरूणअडसड यांनी व्यक्त केले़
दत्तापूर धामणगाव शेतकी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी मारोती मंदिरात अडसड यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली़ तद्नंतर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी मोर्शीचे आ. अनिल बोेंडे, प्रमुख अतिथी म्हणून भाजप नेते अरूण अडसड, सहकार नेते विजय उगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास निस्ताने, पं़स़ सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, नगराध्यक्ष अर्चना राऊत, उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया, भाजपा तालुकाध्यक्ष विठ्ठल राळेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबा ठाकूर, माजी जि़प़सदस्य हरिदास राऊत, अनिल राठी, नितीन मेंढुले, गजानन सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष साहेबराव गावंडे, दुर्गाबक्षसिंह ठाकूर, नवरंग अग्रवाल, गव्हा निपाणी येथील सरपंच अंबादास पडोळे, पं़स़सदस्य सचिन पाटील, वनिता राऊत, खिवराज पनपालीया, संजय जायले, नंदकिशोर ढोले, अमित भगत, समीर महल्ले, भीमराव देशमुख यांची उपस्थिती होती़
भाजपा, शिवसेना तसेच सहकार नेते विजय उगले यांच्या पॅनेलचे या निवडणुकीत वैयक्तिक मतदार संघातून विश्वास केणे, विशाल जयस्वाल, शिवराज पनपालीया, महिला राखीव मतदारसंघातून सुहासिनी देशमुख, अनिता प्रमोद रोंघे, तर अनुसूचित जाती मतदारसंघातून रणजित दहाट, विमुक्त भटक्या जमाती मतदारसंघातून नामदेव बमनोटे सेवा सहकारी संस्थेमधून नितीन मेंढुले, भूजंग चाफले, विनोद औरंगपुरे, बाबा ठाकूर, भोजराज हिवसे, प्रदीप रंगारी, रमेश ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ ही संस्था आमच्या ताब्यात दिल्यास शेतकरी हिताचे गोडाऊन बांधकाम, तारण योजना, आडत्यांचे कामे, इलिक्ट्रिक बिल भरण्याची सुविधा आदी उपक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.