डीटीएड अभ्यासक्रमाला मिळणार नवसंजीवनी
By Admin | Updated: March 22, 2015 01:26 IST2015-03-22T01:26:55+5:302015-03-22T01:26:55+5:30
जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षणसास्त्र पदविका अभ्यासक्रम ‘डीटीएड’ आता डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन (डीईएड) नावाने ओळखला जाणारा आहे.

डीटीएड अभ्यासक्रमाला मिळणार नवसंजीवनी
अमरावती : जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षणसास्त्र पदविका अभ्यासक्रम ‘डीटीएड’ आता डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन (डीईएड) नावाने ओळखला जाणारा आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून बदलविण्यात येणार असून त्याचा आराखडादेखील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे डीटीएड अभ्यासक्रमाला नवसंजीवनी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या पसंतीला पडून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढविण्यास यांची मदत होणार आहे.
दिवसेंदिवस डीटीएडसाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी होत असून त्याची विद्यार्थ्यामध्ये क्रेझही कमी होत आहे. या अभ्यासक्रमाकरिता महाविद्यालयाची संख्या ही मोठी आहे. अशातच अध्यापनाचा ढासळलेला दर्जा यावरदेखील ताशेरे ओढले जात होते. अशातच आता एनसीएफटीई २००९ व एसीटीई रेग्युलेशन २०१४ मधील मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डीएलईडी) पुनर्रचित केलेला आहे.
नव्या आराखड्यानुसार प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देणे, विद्यार्थ्यांना २० आठवडे शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करणे. अशा काही मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एटीकेटी असावी का पदविका अभ्यासक्रमातही सेमी इंग्रजी सुरु करावे का, कार्यानुभव कला, शारीरिक शिक्षण या विषयांची परीक्षा कॉलेज स्तरावर न ठेवता ती परिषदेकडून घेण्यात यावी का, याबाबत परिषदेने अभिप्राय मागविले आहेत.
परिषदेच्या ६६६.े२ूी१३.ङ्म१ॅ.्रल्ल या वेबसाईटवर नवीन आराखडा प्रसिध्द करण्यात आला असून त्यावर अभिप्राय मागविण्यासाठी बुधवार २५ मार्चपर्यंत मुदत आहे. (प्रतिनिधी)