दर्यापूर तालुक्यात दिग्गजांना धक्का, नव्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:21+5:302021-01-19T04:16:21+5:30

दर्यापूर : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींमधील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायतींमधील सत्तारूढ गटांना मतदारांनी धक्का देऊन नव्या उमेदवारांना ...

In Daryapur taluka, a push for veterans, an opportunity for newcomers | दर्यापूर तालुक्यात दिग्गजांना धक्का, नव्यांना संधी

दर्यापूर तालुक्यात दिग्गजांना धक्का, नव्यांना संधी

दर्यापूर : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींमधील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायतींमधील सत्तारूढ गटांना मतदारांनी धक्का देऊन नव्या उमेदवारांना संधी दिली. तालुक्यातील मोठ्या येवदा ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच गटाचा पराभव झाला. ग्रामस्थांनी राऊत- कोकाटे पॅनलला संधी दिली.

वडनेरगंगाईत हुतके पॅनलला आघाडी मिळाली. देशमुख पॅनल माघारले. तसेच शिवरमध्ये सरपंच गटाचा पराभव झाला असून विरोधी पॅनलने ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला. या ठिकाणी मनसे उपतालुकाप्रमुख पंकज कदम यांनी विजय मिळविला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे यांच्या नेतृत्वातील पॅनलचा आमला ग्रामपंचायतीमध्ये दणदणीत विजय झाला, तर माहुली धांडे येथील सरपंच सतीश साखरे यांच्या पॅनलला जनतेने पुन्हा संधी दिली. खल्लार ग्रामपंचायतीमध्ये जि. प. सदस्य सुनील डिके यांच्या पॅनलने संपूर्ण जागा जिंकल्या. गायवाडी ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही एका पॅनलला बहुमत न मिळाल्याने त्या ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. रामगाव येथे ग्राम विकास पॅनलने बाजी मारली. सामदा ग्रामपंचायतीमध्ये प्रभाकर तराळ यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला.

ईश्वर चिठ्ठीने प्रणिता पवार विजयी

नांदेड बुद्रुक ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रणिता पवार आणि ज्योती मालोकार यांना सारखी मते मिळाल्याने या ठिकाणी हिमांशू ढोके या बालकाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्या ठिकाणी प्रणिता पवार यांना विजयी घोषित करण्यात आले.

Web Title: In Daryapur taluka, a push for veterans, an opportunity for newcomers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.