दर्यापूर तालुका अज्ञात तापाच्या विळख्यात
By Admin | Updated: October 28, 2014 22:49 IST2014-10-28T22:49:33+5:302014-10-28T22:49:33+5:30
तालुक्यात विषाणुजन्य तापाची लागण झाली असताना प्रशासन गप्प का? असा सवाल येथील जनता विचारत आहे. परिसरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे

दर्यापूर तालुका अज्ञात तापाच्या विळख्यात
संदीप मानकर - दर्यापूर
तालुक्यात विषाणुजन्य तापाची लागण झाली असताना प्रशासन गप्प का? असा सवाल येथील जनता विचारत आहे. परिसरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
वातावरणात झालेल्या बदलामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखाने गर्दीने फुल्ल झाली आहेत. तालुक्यात अज्ञात तापाने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिक धास्तावले आहेत. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्या वाढल्या आहेत. अनेक ग्रामसेवक कर्तव्य योग्य पध्दतीने बजावत नसल्यामुळे अधिकच बकाल अवस्था निर्माण झाली आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.