दर्यापूर तालुक्यात

By Admin | Updated: May 21, 2016 00:21 IST2016-05-21T00:21:45+5:302016-05-21T00:21:45+5:30

निसर्गाच्या कोपामुळे गतवर्षीच खरीप व रबी हंगाम हातून गेल्यामुळे हवालदिल झालेला बळीराजा आता नव्या उमेदीने येणाऱ्या खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे.

In Daryapur taluka, | दर्यापूर तालुक्यात

दर्यापूर तालुक्यात

कपाशीचे पेरणी क्षेत्र वाढणार
बळीराजा सज्ज : तुरीच्या लागवड क्षेत्रात होणार वाढ
शुभम बायस्कार दर्यापूर
निसर्गाच्या कोपामुळे गतवर्षीच खरीप व रबी हंगाम हातून गेल्यामुळे हवालदिल झालेला बळीराजा आता नव्या उमेदीने येणाऱ्या खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे.
हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकित वर्तविल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या मृग नक्षत्राचा चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीसाठी शेतीच्या मशागतीत ते व्यस्त आहेत.
आगामी हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खते खरेदीसाठी पैशांची तजवीज करण्याचे बळीराजाचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दर्यापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ८० हजार ३८५ हेक्टर असून त्यापैकी ७५ हजार ७८ हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. त्यातील ७२ हजार ८४४ हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली असून यापैकी ७१ हजार ७६३ हेक्टर क्षेत्रफळावर खरीप पिकांची लागवड अपेक्षित आहे. तालुक्यात ओलिताखाली असणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ ७०० हेक्टर आहेत.
२०१६-१७ च्या खरीप हंगामात २० हजार पाचशे चार हेक्टर कपाशी ६११ हेक्टर व ज्वारी १२ हजार ७८० हेक्टर वर तूर १७ हजार ९३५ हेक्टरवर मूंग १५ हजार ९०१ हेक्टरवर सोयाबीन तर १ हजार ८०० हेक्टरवर इतर पिकांची पेरणी अपेक्षित आहे. यासाठी युरिया ३२०४ में टन डीएपी १६७४ मे.टन एम.ओ.पी.८०१ मे.टन तर मिश्र खते ३२८३ में टन एस.एस.पी २१७८ मेट्रिक टन साठा लागणार असल्याचा अंदाज आहे.
तालुक्यासाठी यूरिया १३७०५ मे. टन डीएपी ४६० में टन एम.ओ.पी. ३६० मे. टन तर मिश्र खतांचा साठा २१८० मे. टन एसएसपी १४६० मे. टन इत्यादी प्रकारचा साठा तालुक्यासाठी मंजूर झाला आहे व लवकरच तो उपलब्ध होणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन व मुंग क्षेत्राच्या पेरनित घट होईल तर आणि उडित पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत. हंगामात भरपूर पाऊस पडून चांगले उत्पन्न निघावे यासाठी शेतकरी आत्तापासूनच निसर्गे देवतेला साकडे घालायला सुरुवात केलेली आहे.

Web Title: In Daryapur taluka,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.