शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

त्या चिमुकल्याचा घातपात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : चिमुकल्या अजयचा वाहनात गुदमरून झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा संशय मृताची आई व आजीने ...

ठळक मुद्देआई, आजीला संशय । अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : चिमुकल्या अजयचा वाहनात गुदमरून झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा संशय मृताची आई व आजीने पोलिसांकडे व्यक्त केला आहे.स्थानिक पांढुर्णा रोडवरील शिक्षक कॉलनीलगतच्या शिवारातून रविवारी बेपत्ता झालेल्या अजय पंधरेचा मृतदेह शुक्रवारी बंद कारमध्ये आढळून आला. त्याच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त करण्यात येत असल्याने नातेवाईक व पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.आई-वडील शेतमजुरीस गेल्यानंतर रविवारी सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत अजय हा झोपडीतून बेपत्ता झाला होता. मुलाला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार पालकांनी सोमवारी वरुड पोलिसांत नोंदविली. दरम्यान, ज्या शेतात पंधरे कुटुंब राहते, त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर श्रीसाईराम वॉशिंग सेंटरच्या बाजूला नादुरुस्त एम.एच.०१ व्ही.ए ४३४९ या क्रमांकाच्या कारमध्ये अजयचा मृतदेह आढळून आला.असा आहे पोलिसांचा कयासकार आणि मृत अजयच्या घराचे अंतर हे १०० मीटरचे आहे. घरी कुणी नसल्याने अजय घराबाहेर पडला. खेळता-खेळता तो कारजवळ आला. आत गेल्यावर कारची दारे त्याला उघडता आली नाही. त्यात गुदमरून वा अतितापमानामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तविली. वैद्यकीय आणि न्यायवैद्यक परीक्षण अहवाल सोमवारपर्यंत येऊ शकतो. त्यानंतर उलगडा होईल, अशी माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली.पंधरवाड्यापूर्वी झाला होता वादमृत अजयची आई ललिता पंधरे आणि आजी रमा चिंचामे यांच्यानुसार, अजय हा १५ दिवसांपूर्वी लोखंड वेचण्यासाठी जवळच्या नाल्याजवळ गेला होता. तेव्हा मुलांमध्ये भांडण झाले होते. यावेळी काही लोकांनी येऊन त्याला मारझोड केली तथा धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अजयचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू