उघडे रेल्वे फाटक अपघातासाठी धोक्याचे

By Admin | Updated: October 16, 2015 00:40 IST2015-10-16T00:40:22+5:302015-10-16T00:40:22+5:30

रेल्वे फाटकावर अपघात होण्याच्या घटना बघता रेल्वे प्रशासनातर्फे फाटकावरील गार्डची नियुक्ती केली आहे.

Dangers for an open rail gate accident | उघडे रेल्वे फाटक अपघातासाठी धोक्याचे

उघडे रेल्वे फाटक अपघातासाठी धोक्याचे

रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा : नागरिकांमध्ये संताप
सुमित हरकूट चांदूरबाजार
रेल्वे फाटकावर अपघात होण्याच्या घटना बघता रेल्वे प्रशासनातर्फे फाटकावरील गार्डची नियुक्ती केली आहे. मात्र नरखेड मार्गावरील चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा मार्गावरील रेल्वे फाटकावर गार्ड उपस्थित राहत नसल्याने भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता आहे.
अमरावती-नरखेड मार्गावर दररोज ६-७ रेल्वे गा्या धावतात. तसेच देशाची राजधानी दिल्ली येथे जान्याकरिता सर्वात ‘शॉर्टकट’ मार्ग असलेला नरखेड मार्गावरुन इंदौर-यशवंतपुर, जयपूर-सिंकदराबाद, काचीकुडा एक्सप्रेससह अनेक मालगाड्या धावतात. या मार्गावर अमरावती, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी दररोज प्रवास करतात. यामुळे हा रेल्वेमार्ग फार वर्दळीचा आहे. तसेच नागपूरहून लांब पल्ल्याचा धावणाऱ्या गाड्या त्या मार्गावर अपघात झाल्यास या नरखेड मार्गावरून वळविल्या जातात.
अशातच या मार्गावरून अनेक लहान मोठ्या गावांतून ही रेल्वे जाते. तेव्हा या गावातील रेल्वे क्रॉसिंगच्या फाटकावर गार्डची नियुक्ती केलेली असते हे गार्ड सिग्नल मिळताच रेल्वे फाटक बंद करतात. वर रस्त्यावरीव वाहतूक थांबवितात. ज्यामुळे होणारा अपघात टळतो. परंतु बेलोरा रेल्वे क्रॉसिंगवर गार्डची नियुक्ती नसल्याने या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या जेव्हा ये- जा करतात तेव्हा सदर रेल्वे फाटक उघडेच असते व वाहतूकही सर्रास सुरुच असते. या क्रॉसिंगवरून शाळकरी विद्यार्थी, चरणारी गुरे, नागरिक दिवसभर ये-जा करतात. मात्र रेल्वे फाटक उघडे असल्याने रेल्वे सध्या येण्याचे गृहीत धरून वाहतूक सुरुच असते.

Web Title: Dangers for an open rail gate accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.