पुसल्यात धोकादायक संरक्षण भिंतीची रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST2021-07-14T04:16:26+5:302021-07-14T04:16:26+5:30

पुसला : येथील बुनियादी स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची संरक्षण भिंत शिकस्त झाली असून दहा ...

Dangerous protective wall paint in the puddle | पुसल्यात धोकादायक संरक्षण भिंतीची रंगरंगोटी

पुसल्यात धोकादायक संरक्षण भिंतीची रंगरंगोटी

पुसला : येथील बुनियादी स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची संरक्षण भिंत शिकस्त झाली असून दहा दिवसांपूर्वीच ती ढासळली. त्या भिंतीची दुरुस्ती न करता तिची रंगरगोटी करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्हा परिषदेकडून प्राप्त निधीचा दुरुपयोग होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

स्थानिक आठवडी बाजार परिसरातील मुलांची जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेची शिकस्त संरक्षण भिंत काही दिवसांपूर्वीच ढासळली. त्यामुळे ती कधीही पडण्याची शक्यता असून जीवितहानी होण्याचा धोका आहे. तरीही या भिंतीवर रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे परिसरात नागरीक आश्चर्य व्यक्त होत आहे.

-------------

जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीची रंगरंगोटीऐवजी त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे रगरंगोटीवर खर्च व्यर्थ गेला आहे.

- संजय श्रीराव, ग्रामपंचायत सदस्य, पुसला

Web Title: Dangerous protective wall paint in the puddle