त्रिसुत्रीचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:13 IST2021-04-09T04:13:27+5:302021-04-09T04:13:27+5:30

फोटो ०८एएमपीएच१० कॅप्शन - सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला भेट देताना डॉ. अमितेश गुप्ता, डॉ. संजय राय, िजल्हाधिकारी शेलेश नवाल, डॉ. रविभूषण ...

Danger of third wave if Trisutri is not followed | त्रिसुत्रीचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका

त्रिसुत्रीचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका

फोटो ०८एएमपीएच१० कॅप्शन - सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला भेट देताना डॉ. अमितेश गुप्ता, डॉ. संजय राय, िजल्हाधिकारी शेलेश नवाल, डॉ. रविभूषण

अमरावती : कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व नागरिकांकडून ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर’चे पालन होणे आवश्यक आहे. त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सगळीकडे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचे पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाने गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने गुरुवारी दुपारी जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा या पथकात समावेश आहे. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाकडून कोरोना उपाययोजनांबाबत बैठकीद्वारे माहिती घेतली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविंशात पांडा, पालिका आयुक्त प्रशांत रोडे, सीएस श्यामसुंदर निकम, डीएचओ दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सादरीकरण केले व कोरोना उपाययोजनांत कार्यान्वित झालेली रुग्णालये, विलगीकरण केंद्रे, ग्रामीण भागातील व्यवस्था, ऑक्सिजन व्यवस्था, लसीकरण आदी विविध बाबींची माहिती पथकाला दिली

बॉक्स

कंटेनमेंट झोन, होम आयसोलेशन कक्षाला भेट

पथकाने जिल्हा कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील स्टाफशी चर्चा केली. त्यानंतर पथकाने समता कॉलनीतील कंटेनमेंट झोनला भेट देऊन पाहणी केली, तसेच महापालिकेच्या सुदामकाका देशमुख सभागृह स्थित गृह विलगीकरण नियंत्रण कक्षालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. लसीकरण केंद्रे, ग्रामीण भागातील यंत्रणा आदींचीही पाहणी पथकांकडून होणार आहे.

Web Title: Danger of third wave if Trisutri is not followed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.