वित्त समिती सभेला दहा विभागाच्या खाते प्रमुखांची दांडी
By Admin | Updated: July 14, 2016 00:19 IST2016-07-14T00:19:12+5:302016-07-14T00:19:12+5:30
जिल्हा परिषद वित्त विषय समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी वित्त सभापतीच्या दालनात बोलविण्यात आली होती.

वित्त समिती सभेला दहा विभागाच्या खाते प्रमुखांची दांडी
तीनच विभागाचे अधिकारी हजर : गैरहजर अधिकाऱ्यांना कारवाईचे पत्र
अमरावती : जिल्हा परिषद वित्त विषय समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी वित्त सभापतीच्या दालनात बोलविण्यात आली होती. मात्र या सभेला जिल्हा परिषदेतील तब्बल दहा विभागाचे खाते प्रमुखच गैरहजर राहिल्याने सभापती सह सदस्यांचाही पारा चढला. त्यामुळे नेहमीच जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभेला दांडी मारणाऱ्या या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस १३ जुलै रोजीच्या सभेत वित्त समितीने ठराव घेवून हा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांना पाठविण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा परिषद म्हटल की, या ठिकाणी सभा, आढावा याची काही कमी नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या सत्तेत पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी सभा बोलविली की विविध विभागाचे बरेच खातेप्रमुख नेहमीच गैरहजर राहतात. नियम, प्रशासकीय शिस्तीत काम चालावे असे अपेक्षित आहे. त्यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकविणयाचा मानस सोेडला, हे विशेष.