तळेगाव दशासर येथे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:57+5:302021-06-02T04:11:57+5:30
फोटो पी ०१ तळेगाव तळेगाव दशासर : गावात २९ मे रोजी झालेल्या वादळी पावसाने थैमान घातल्याने फार मोठे ...

तळेगाव दशासर येथे नुकसान
फोटो पी ०१ तळेगाव
तळेगाव दशासर : गावात २९ मे रोजी झालेल्या वादळी पावसाने थैमान घातल्याने फार मोठे नुकसान झाले. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी मंगळवारी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
प्रभाग क्र. ४ मधील ज्ञानेश्वर चन्ने यांच्या घरावर अंगणातील पिंपळाचे झाड कोसळल्याने त्यांचे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. रमेश खंडारे यांच्या घराचे छत उडाले होते. नुकसान ग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिता मेश्राम, सरपंच मीनाक्षी ठाकरे, दिवाकर ठाकरे, सचिन रामगावकर, संजय काळबेंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य नंदा बैलकर, सुषमा नंदागवळी, रोशनी गुल्हाने, सुचिता चकधरे, रियाज, पुरुषोत्तम उडाखे आदी उपस्थित होते.