तळेगाव दशासर येथे वादळी वाऱ्यामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:11 IST2021-05-31T04:11:00+5:302021-05-31T04:11:00+5:30

तळेगाव दशासर : तळेगाव दशासर येथे शनिवारी झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने गावात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

Damage due to strong winds at Talegaon Dashasar | तळेगाव दशासर येथे वादळी वाऱ्यामुळे नुकसान

तळेगाव दशासर येथे वादळी वाऱ्यामुळे नुकसान

तळेगाव दशासर : तळेगाव दशासर येथे शनिवारी झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने गावात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अनुशंगाने आमदार प्रताप अडसड यांनी तळेगाव गाठून नुकसानाची पाहणी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कॊरॊना महामारी दरम्यान मोलाच सहकार्य लाभलेले आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, व आशा वर्कर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. आकाश चौरेवार, डॉ. शिवानी निचळ, वाहन चालक रुपेश उडाखे उपस्थित होते. त्यानंतर गावातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. यावेळी पं. स. नरेंद्र रामावत, माजी सरपंच मनोज बानोडे, शाम घाटे, रामप्रसाद चन्नव, गजानन झिटे, गजानन शेंद्रे, भारती चुटे इत्यादी उपस्थित होते.

Web Title: Damage due to strong winds at Talegaon Dashasar