शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शंभरीतील गोविंदरावांची दिनचर्या युवकांनाही लाजवणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:47 IST

नाव गोविंदराव गंगारामजी मसने... राहणार शिंदी बु., तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती... ते १ मे रोजी वयाची शंभरी गाठणार आहेत. त्यांना या वयातही विनाचष्म्याने वृत्तपत्र आणि पुस्तक वाचन करताना पाहून लोक आश्चर्याने पाहतात.

ठळक मुद्देदररोज मॉर्निंग वॉक : विनाचष्म्याने वाचतात वृत्तपत्र, शेतीतही केले नवनवीन प्रयोग

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : नाव गोविंदराव गंगारामजी मसने... राहणार शिंदी बु., तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती... ते १ मे रोजी वयाची शंभरी गाठणार आहेत. त्यांना या वयातही विनाचष्म्याने वृत्तपत्र आणि पुस्तक वाचन करताना पाहून लोक आश्चर्याने पाहतात. त्यांची दिनचर्या युवकांनाही लाजविणारी आहे. दररोज मॉर्निंग वॉक, रुग्णांची तपासणी, सायंकाळी आर्य समाजाचा प्रचार-प्रसार ते नित्यनेमाने करतात.दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याची त्यांची निरंतर सवय. थकवा येईल तिथपर्यंत, अर्धा किलोमीटर मॉर्निंग वॉक. मग सकाळचा चहा किंवा दूध, सोबत दोन ते तीन बिस्कीट. त्यानंतर दवाखान्यात आलेल्या बालरुग्णांची तपासणी. ११ वाजता जेवण, त्यानंतर वृत्तपत्र आणि पुस्तकांचे वाचन आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत झोप. उठल्यावर पुन्हा चहा आणि मग घरी आलेल्या गावातील नागरिकांसोबत आर्य समाजाची चर्चा, रात्री आठ वाजता जेवण आणि मग झोप, अशी दिनचर्या असलेले गोविंदराव अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. पंचक्रोशीत आदरणीय असे व्यक्तिमत्त्व आहेत.१ मे १९१८ रोजी जन्मलेले गोविंदराव पेशाने शिक्षक. मुख्याध्यापक पदावरून ते निवृत्त झाले. शाळा सांभाळताना एक उत्कृष्ट शेतकरी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिंदी बु. या इवल्याशा खेड्यात त्याकाळी त्यांनी पहिल्यांदा नगदी पीक म्हणून ओळख असलेले सोयाबीनचे बी आणले होते. शेतकऱ्यांना ते पसंत पडले. शिक्षक, उत्कृष्ट शेतकरी आणि बालरोग चिकित्सा म्हणून परिसरात त्यांची ख्याती आहे. त्यांचे नातू डॉ. जितेंद्र मसने व नातसून अश्विनी त्यांच्या या कार्यात दररोज सहभागी होतात.सेवानिवृत्तीनंतर घेतले वैद्यकीय शिक्षणमुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वस्थ बसणारे गोविंदराव नव्हते. त्यांनी तत्कालीन मान्यताप्राप्त आर.एम.पी. (रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर) ही पदवी प्राप्त केली. शिंदी, पोही, कापूसतळणी आदी भागात बालरोग चिकित्सक म्हणून त्यांची ख्याती होती. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळात रंगमंचावरही त्यांनी काम केले. वयाच्या शंभराव्या वर्षीसुद्धा त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. शेतातही ते चक्कर मारून येतात. खो-खो, कबड्डी त्यांचे आवडते खेळ आहेत.‘लोकमत’ न दिसल्यास संतापतातपुस्तकांसोबतच वृत्तपत्र वाचण्याची गोविंदरावांची आवड आजही कायम आहे. ‘लोकमत’चे ते दररोज वाचन करतात. सकाळी ‘लोकमत’ न दिसल्यास संताप व्यक्त करतात. लोकमत आणि आपली शंभरावी सोबत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.