आठवणी जपण्यासाठी दादासाहेब गवर्इंचे स्मारक
By Admin | Updated: January 8, 2016 00:14 IST2016-01-08T00:14:21+5:302016-01-08T00:14:21+5:30
रिपब्लिकन चळवळीचे अध्वर्यू तथा केरळ-बिहारचे माजी राज्यपाल स्व. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवर्इंच्या आठवणी, त्यांची कार्यविविधता स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणार आहे.

आठवणी जपण्यासाठी दादासाहेब गवर्इंचे स्मारक
५ सदस्यीय समिती : जागेचा शोध घेणार
अमरावती : रिपब्लिकन चळवळीचे अध्वर्यू तथा केरळ-बिहारचे माजी राज्यपाल स्व. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवर्इंच्या आठवणी, त्यांची कार्यविविधता स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणार आहे.
दादासाहेबांचे स्मारक उभारण्यायोग्य जागेची निवड करण्यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज ७ जानेवारीला याबाबत स्थगनादेश काढला आहे.
पालकमंत्री प्रवीण पोटे अध्यक्ष असलेल्या पाच सदस्यीय समितीत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांचेकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दादासाहेबांचे चिरंजीव तथा रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई आणि अमरावतीचे आमदार सुनील देशमुख हे सदस्य तर जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत.
दादासाहेब गवर्इंच्या स्मारक उभारण्याकरिता योग्य जागेची निवड करणे, जागा उपलब्ध करणे व स्मारकाचा प्रस्ताव/आराखडा तयार करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती स्व. रा. सू. गवई उपाख्य दादासाहेबांच्या कुटुंबीय तसेच विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून शासनास शिफारस करणार आहे. (प्रतिनिधी)